तस्करांच्या तावडीतून 6 गोवंशांची सुटका

*चारचाकी वाहनासह 9 लाखांचा मुद्देमाल जप्त

    दिनांक :17-Dec-2025
Total Views |
चंद्रपूर, 
cattle-smuggling : चारचाकी वाहनात कोंबून कत्तलीसाठी नेत असलेल्या 6 जनावरांची तस्करांच्या तावडीतून सुटका विरुर पोलिसांनी केली. या कारवाईत चारचाकी वाहनासह एकूण 9 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवार, 17 डिसेंबर रोजी करण्यात आली.
 
 
J K
 
विरुर पोलिसांनी गस्तीवर असताना एका चारचाकी वाहन (एमएच 34 बीझेड 9490) ला थांबवून पंचासमक्ष तपासणी केली असता, त्यात 6 नग गोवंशांची (बैल) कत्तलीकरिता अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी 1 लाख 50 हजार रुपये किंमतीचे 6 गोवंश, 7 लाख 50 हजार रुपये किंमतीचे वाहन असा एकूण 9 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वाहन चालकाविरुध्द विरुर पोलिस ठाण्यात कलम 11(1) (क) प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 व कलम 5 (ब), 9,11 महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
 
 
ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक संतोष वाकडे यांच्या नेतृत्वात विरुर पोलिस ठाण्यातील अंमलदारांनी केली. पुढील तपास विरुर पोलिस करीत आहेत.