नागपूर,
Doordarshan news विदर्भ विभागातील घटना आणि उपलब्धींना राष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी नागपूरमध्ये नियमित दूरदर्शन बातमीपत्र सुरू करण्याची मागणी डॉ. प्रवीण डबली यांनी केली आहे. त्यांनी केंद्र सरकारचे माहिती व प्रसारण मंत्री, मंत्रालयाचे सचिव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि नागपूरचे खासदार यांना निवेदन पाठवून तातडीने या सेवा सुरू करण्याची विनंती केली.
डॉ. डबली म्हणाले की विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आदिवासी लोकसंख्या असून काही भाग नक्षलग्रस्त आहेत. त्यामुळे मुंबईकेंद्रित राज्यस्तरीय बुलेटिनमध्ये येथील समस्या आणि घटना पुरेशा प्रमाणात समोर येत नाहीत. देशाचे भौगोलिक केंद्र असून येथे अनेक राष्ट्रीय आणि प्रशासनिक संस्था आहेत. Doordarshan news दूरदर्शन नागपूर केंद्राची तांत्रिक क्षमता पूर्ण असून फक्त अनुभवी कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्यास १०-१५ मिनिटांचे नियमित बातमीपत्र सुरू करता येईल. डॉ. डबली म्हणाले की विदर्भाचा आवाज राष्ट्रीय माध्यमांमध्ये पोहोचणे फक्त प्रादेशिक संतुलनासाठीच नाही, तर देशातील लोकशाहीसाठीही आवश्यक आहे.
सौजन्य: डॉ. प्रवीण डबली, संपर्क मित्र