देवळी,
devendra-fadnavis : नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत देवळीचे राजकारण चांगलेच तापले. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार शोभा तडस यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा उद्या बुधवार १८ रोजी दुपारी ३ वाजता स्थानिक आठवडी बाजार चौक येथे आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विजय संकल्प सभेकडे शहराचे लक्ष लागले आहे.
भाजपच्या अध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार शोभा रामदास तडस तसेच दहाही प्रभागातील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा निर्णायक ठरेल अशी चर्चा व्यत केली जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेमुळे प्रचाराला नवी धार येणार असून देवळीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. या विजय संकल्प सभेला राज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर, आ. राजेश बकाने, आ. समीर कुणावर, आ. सुमित वानखेडे, आ. दादाराव केचे यांच्यासह माजी खासदार रामदास तडस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या सभेतून विकास, स्थैर्य आणि सुशासनचा निर्धार मतदारांपर्यंत पोहोचवला जाणार असून देवळी नगरपरिषद निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस देवळीकरांना कोणता विजय संकल्प देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.