डॉ. कल्याणी देशमुख यांचे गायन

    दिनांक :17-Dec-2025
Total Views |
नागपूर,
Dr. Kalyani Deshmukh सुप्रसिद्ध ज्येष्ठ तबला वादक व संगीतज्ञ पं. गोपाळराव वाडेगावकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित “मासिक संगीत साधना” हा गायन-वादनाचा कार्यक्रम रविवार, दिनांक २१ डिसेंबरला सकाळी ९.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
 
 

desh 
 
पं. गोपाळराव वाडेगावकर शिष्य परिवार व दि ब्लाइंड रिलीफ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या कार्यक्रमात सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका सूरमणी डॉ. कल्याणी देशमुख यांचे शास्त्रीय गायन सादर होणार आहे. त्यांना तबल्यावर अथर्व शेष तर संवादिनीवर संदीप गुरमुळे संगत करणार आहेत. Dr. Kalyani Deshmukh तसेच युवा तबला वादक आकाश जवादे यांचे तबला वादन होणार असून त्यांना लहरावादनाची संगत प्रज्योत म्हैसकर करणार आहेत.हा कार्यक्रम दि ब्लाइंड रिलीफ असोसिएशनच्या “नवदृष्टी सभागृह”, साऊथ अंबाझरी रोड येथे होणार असून संगीत रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन विरथ वाडेगावकर, डॉ. उदय गुप्ते व संदेश पोपटकर यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
सौजन्य:गजानन रानडे,संपर्क मित्र