अनिल कांबळे
नागपूर,
Ganja sale : विधानभवानाला लागूनच असलेल्या झाेपडपट्टीत गांजा विक्री करणाèया एका हिलेसह दाेघांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विराेधी पथकाने अटक करून त्यांच्या ताब्यातून 2 किलाे 73 ग्रॅ गांजा जप्त केला. फिराेजा ऐजाज रिफक पठाण (38) मिठानिम दर्गा झाेपडपट्टी आणि मीर आसिफ शाैकत अली (50) आयबीए राेड, गिट्टीखदान अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत.
विधानभवनाला लागूनच मागील बाजूला असलेल्या अजब बंगल्याजवळ मिठा निमदर्गा आहे. या दर्ग्याजवळ काही लाेकांनी अनधिकृतरित्या अतिक्रण करून झाेपडपट्टी वसवली आहे. या झाेपडपट्टीत दिवसरात्र गुन्हेगार प्रवृत्तीच्या लाेकांची ये-जा सुरू असते. िफराेजा एजाज ही झाेपडपट्टीत गांजा विक्री करते, अशी माहिती अंमली पदार्थ विराेधी पथकाला मिळाली हाेती. या माहितीच्या आधारे मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास पाेलिसांनी फिराेजाच्या झाेपडीत धाड घातली. त्यावेळी तेथे मीर आसिफ हा सुद्धा हजर हाेता. पाेलिसांनी फिराेजाच्या घराची झडती घेतली असता एका स्टिलच्या डब्यात 2 किलाे 73 ग्रॅम गांजा मिळून आला. पाेलिसांनी दाेघांचीही विचारपूस केली असता बंडू उफर् विश्वनाथ हिरालाल यादव (58) आणि वसीम उफर् गब्बर अब्दुल रीक पठाण (40) रा. मिठा निम दर्गा झाेपडपट्टी यांच्याकडून गांजा खरेदी केल्याची कबुली दिली. याप्रकरणी सीताबर्डी पाेलिस ठाण्यात गुन्हा नाेंदवून दाेन्ही आराेपींना अटक केली. पाेलिस निरीक्षक गजानन गुल्हाने व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
उपायुक्त कार्यालय हाकेच्या अंतरावर
गेल्या अनेक वर्षांपासून फिराेजा पठाण ही घरातूनच गांजाविक्री करीत हाेती. महागड्या कार आणि महाविद्यालयीन मुली आणि महिलासुद्धा फिराेजाकडून गांजा विकत घेत हाेत्या, अशी माहिती आहे. िफराेजाच्या घराच्या हाकेच्या अंतरावर पाेलिस उपायुक्तांचे कार्यालय आहे. तसेच गुन्हे शाखेचे पथक आणि सीताबर्डी पाेलिसांची नेहमी गस्त असल्यानंतरही आतापर्यंत कारवाई का झाली नाही, असा प्रश्न विचारल्या जात आहे.