इनरव्हील क्लबकडून विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप

    दिनांक :17-Dec-2025
Total Views |
नागपूर,
Inner Wheel Club of Nagpur इनरव्हील क्लब ऑफ नागपूरच्या वतीने लोकमान्य कॉन्व्हेंट येथील विद्यार्थ्यांना थंडीपासून संरक्षणासाठी स्वेटरचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात क्लबच्या अध्यक्षा सुप्रिया जोशी व उपाध्यक्षा पूजा सावजी यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले.
 

meena 
 
 
 
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी स्वतःची महत्त्वाकांक्षा जोपासण्याचे आवाहन केले तसेच भविष्यात कोण बनायचे आहे, याबाबत मुलांना विचारले. विद्यार्थ्यांनीही मनमोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त करत भविष्यातील स्वप्ने, आवडी-निवडी सांगितल्या. Inner Wheel Club of Nagpur यानंतर विद्यार्थ्यांना स्वेटरचे वाटप करून खाऊ देण्यात आला. शाळेच्या प्राचार्या सौ. संगीता लाडखेडकर यांनी या उपक्रमाबद्दल इनरव्हील क्लबचे मनःपूर्वक आभार मानले.
सौजन्य:मीनाक्षी देशपांडे,संपर्क मित्र