मुंबई,
Manikrao Kokate is going to be arrested राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे सदनिका घोटाळाप्रकरणात दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा कायम राहिल्यानंतर अटक धोका ओढवत आहेत. नाशिक जिल्हा न्यायालयाने मंगळवारी त्यांच्या दोषी ठरविल्यामुळे कोणत्याही क्षणी अटक वॉरंट जारी होऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे. त्यांच्या विरोधात हस्तक्षेप याचिका दाखल करणाऱ्या अंजली दिघोळे राठोड यांनी प्रथम वर्ग न्याय न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात अटक वॉरंट काढण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.
माणिकराव कोकाटे यांचे वकिल या अर्जाविरोधात उच्च न्यायालयात तातडीने स्थगिती मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान, क्रीडा मंत्री आज मुंबईत अजित पवार यांची भेट घेणार होते, परंतु पोलिस अटक करण्याची शक्यता निर्माण झाल्याने भेटीची परिस्थिती संशयास्पद बनली आहे. यापूर्वी, सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर माणिकराव कोकाटे संकटात सापडले होते. विरोधकांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा दबाव आणला असता, अजित पवार यांनी त्यांचा कृषीमंत्रीपद काढून त्यांना क्रीडामंत्री म्हणून नेमले होते. आता जिल्हा न्यायालयाने सदनिका घोटाळाप्रकरणातील दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवल्यामुळे नैतिकतेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.