अनिल कांबळे
नागपूर,
Nagpur illicit tobacco seizure शहरात प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू आणि नायलाॅन मांजा विक्रीवर बंदी आहे. तरीही लाखाेंचा सुगंधित तंबाखू आणि मांजाची तस्करी केल्या जात आहे. यावरुन शहरात पाेलिसांचा वचक कमी झाला की काय, असा संशय निर्माण झाला आहे. गेल्या चाेवीस तासांत प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि नायलाॅन मांजाची बेकायदेशीर वाहतूक आणि साठेबाजी करणाèया दाेघांना पाेलिसांनी अटक केली. तहसील आणि मानकापूर पाेलिस हद्दीत दाेन पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी ही तस्करी पडकली. तहसील पाेलिसांनी सव्वा चार लाखांचा 342 किलाेग्रॅम सुगंधी तंबाखू आणि मानकापूर पाेलिसांनी 15 हजारांचा 18 चक्री मांजा पकडला.
पाेलिस आयुक्त डाॅ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सकारात्मक पाऊले उचलत ‘ड्रग्ज ्री सीटी’ अभियान हाती घेतले. शहरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण केली. शहरात प्रतिबंधित तंबाखू, मांजा, ड्रग्ज आणि हुक्का पार्लरवर लक्ष्य केंद्रीत करीत बरेच यश मिळवले. मात्र, आयुक्तांच्या सकारात्मक धाेरणाला पाेलिस अधिकारी आणि कर्मचारी तडा देत असल्याचे चित्र दिसत आहे.
गस्तीवर असलेल्या तहसील पाेलिसांच्या पथकाला गाेळीबार चाैकात टाेपरे यांच्या विहीरीजवळ एक जण माेठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधीत तंबाखूची साठेबाजी करत असल्याची माहिती मिळाली. पथकाने या बाबत अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाला माहिती दिली. पाेलिस आणि एफडीएच्या पथकाने संयुक्तरित्या कारवाई करीत नामदेव श्रवण तराळे याच्या घरावर छापा टाकला. पाेलिसांना तिथे 342 किलाे असा सव्वा चार लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला. एफडीएच्या पथकाने पंचनामा करताच पाेलिसांनी प्रतिबंधित तंबाखूची बेकायदेशीर साठेबाजी करणाèया नामदेव तराळेला अटक केली.
महाकाली नगरातल्या टाॅवर लाईन जवळ प्रतिबंधित नायलाॅन मांजाची तस्करी हाेणार असल्याची माहिती मानकापूर पाेलिसांना मिळाली हाेती. पाेलिसांनी पाळत ठेवत सागर प्रदीप शाहू (23) याच्याजवळील पाेत्याची झडती घेतली असता त्यात पाेलिसांना मांजाच्या 18 चक्री सापडल्या. त्याने हा माल चेतनकडून विकत घेतल्याचे सांगितल्यानंतर पाेलिसांनी चेतनचाही शाेध सुरू केला आहे.