पाकिस्तानची भाषा बोलणारा पक्ष 'काँग्रेस' - नितेश राणे

गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी विशेष समिती

    दिनांक :17-Dec-2025
Total Views |
मुंबई,
Nitesh Rane, महाराष्ट्राच्या इतिहासाचे आणि वैभवाचे प्रतीक असलेल्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांच्या संरक्षणासाठी महायुती सरकारने निर्णायक पाऊल उचलले आहे. गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या समितीच्या सह-अध्यक्षपदी महसूल मंत्री, वन मंत्री तसेच मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली.
 

मुंबई, Nitesh Rane 
मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्रालयात माध्यमांशी संवाद साधताना मंत्री नितेश राणे यांनी या निर्णयाची सविस्तर माहिती दिली. गडकिल्ल्यांवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत अतिक्रमणे होत असून, काही ठिकाणी थडगी उभारून हिरव्या चादरी टाकण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. अशा अतिक्रमणांवर कारवाई करताना अनेकदा लोक एकत्र जमतात आणि काही प्रकरणांत शस्त्रसुद्धा सापडल्याचा दावा त्यांनी केला.“गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण म्हणजे इतिहास पुसण्याचा प्रयत्न आहे. ही मानसिकता जिहादी विचारसरणीतून येते. आमच्या गडकिल्ल्यांवर कोणाचीही वाकडी नजर खपवून घेतली जाणार नाही,” असा इशाराही मंत्री राणे यांनी दिला. वेळेत कारवाई झाली नाही, तर भविष्यात अडचणी वाढतील, असे नमूद करत त्यांनी उद्यापासूनच या दिशेने ठोस कारवाई सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले.विशेष समितीत छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्वाच्या विचारांवर कोणतीही तडजोड न करणारे सदस्य असल्याचे सांगत, हिंदू राष्ट्रात अशा प्रकारच्या अतिक्रमणांसाठी कोणताही हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
 
 
दरम्यान, Nitesh Rane, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीवर भाष्य करताना मंत्री नितेश राणे यांनी मुंबईच्या सांस्कृतिक ओळखीचा उल्लेख केला. “मुंबईचा डीएनए हिंदुत्व आणि महादेव आहे. ‘आय लव्ह पाकिस्तान’ म्हणणाऱ्यांना येथे स्थान नाही. महादेवावर श्रद्धा ठेवणारी आणि त्यांच्या विचारांवर चालणारी व्यक्तीच मुंबईची महापौर होईल,” असे त्यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व आणि मुंबईचे संरक्षण केले आणि कधीही तडजोड केली नाही, असेही त्यांनी नमूद केले.यावेळी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भातील वक्तव्यावरही मंत्री राणे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. ऑपरेशनदरम्यान भारताचा पराभव झाला असल्याचे चव्हाण यांचे विधान अत्यंत वादग्रस्त असल्याचे सांगत, “काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलणारा पक्ष आहे, यात काही नवीन नाही. पाकिस्तानचे हिरवे झेंडे मिरवणुकीत फिरवले गेले होते, हे आम्ही विसरलेलो नाही,” असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.महायुती सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील ऐतिहासिक गडकिल्ल्यांच्या संरक्षणाला बळ मिळणार असून, अतिक्रमणांविरोधात कठोर कारवाईची दिशा स्पष्ट झाली आहे.