इतिहासाची पुनरावृत्ती...पाकिस्तानचे होणार १२ तुकडे?

    दिनांक :17-Dec-2025
Total Views |
इस्लामाबाद,
Pakistan divided into 12 pieces सध्याच्या घडामोडींनुसार पाकिस्तानमध्ये राजकीय आणि सामाजिक परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. पाकिस्तानच्या सर्व कारभारावर असीम मुनीर यांनी ताबा घेतला असून, ते देशातील सर्व सशस्त्र दलांवर नियंत्रण ठेवतात. त्यांनी पाकिस्तानमधील कायदा देखील बदलला आहे आणि त्यांच्या विरोधात कोणताही खटला दाखल करता येणार नाही. इम्रान खानच्या समर्थकांच्या आंदोलनांना त्यांनी दडपले आहे आणि आता असीम मुनीर देशाचे फील्ड मार्शल म्हणून स्थित आहेत. पाश्चात्य देशांना दाखवले जात आहे की पाकिस्तानमध्ये सर्व काही सुरळीत आहे, तरी प्रत्यक्षात देशातील जनता संतापाने भरलेली आहे.
 

Pakistan was divided 
इम्रान खानवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात लोकांच्या मनात नाराजी वाढत आहे. याच दरम्यान, पाकिस्तानमध्ये स्वतंत्र सिंध राज्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे. जेय सिंध चळवळ या आंदोलनाच्या माध्यमातून ही मागणी उठवली जात आहे. पीपीपी पक्षानेही सिंधच्या विभाजनाच्या विरोधात आवाज उठवला आहे. पाकिस्तानचे मंत्री अब्दुल अलीम खान यांनी सांगितले की सध्या चार प्रांत असलेल्या पाकिस्तानमध्ये प्रशासन अधिक सुलभ करण्यासाठी प्रांतांची संख्या १२ केली जाईल. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तानचे १२ तुकडे होऊ शकतात, असा अंदाज काही अहवालांमध्ये व्यक्त केला गेला आहे.
सिंधी, खैबर आणि बलुच लोकांमध्ये बंडाची ठिणगी लवकरच पेटली असून, बलुच लोकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. इतिहास पाहता, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रांत (सध्याचे खैबर पख्तूनख्वा), पंजाब, सिंध आणि बलुचिस्तान हे प्रांत पाकिस्तानचे भाग होते. 1971 मध्ये पूर्व पाकिस्तान वेगळे होऊन बांगलादेश बनल्यामुळे पाकिस्तानचा फक्त हा भाग शिल्लक राहिला. सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानमध्ये सामाजिक उद्रेक वाढत आहे आणि लोक आक्रमक भूमिकेत आहेत.