राजेंद्र बनसोड यांना केंद्र शासनाचा पुरस्कार

    दिनांक :17-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
rajendra-bansod : भारत सरकारच्या गृह विभागांतर्गत महासंचालनालय नागरी सुरक्षा व गृहरक्षक दल यांच्या वतीने 63 व्या गृहरक्षक दल स्थापना दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी घोषित पुरस्कारात जिल्ह्यातील गृहरक्षक दलाचे सेंटर कमांडर राजेंद्र बनसोड यांना डीजी सीडी ब्राँझ डिस्क व प्रशंसा प्रमाणपत्र जाहीर करण्यात आले आहे.
 

y17Dec-Rajendra-Bansod 
 
 
 
गृहरक्षक दलातील उत्कृष्ट कार्य, कर्तव्यनिष्ठा व समाजसेवेसाठी हा प्रतिष्ठित पुरस्कार दिला जातो. आपत्ती व्यवस्थापन, समाजसेवा, जनजागृती व नागरी सुरक्षेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल बनसोड यांची निवड झाली आहे. हा पुरस्कार देशातील 28 राज्ये व 8 केंद्रशासित प्रदेशातील निवडक अधिकाèयांना शासकीय समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.
 
 
पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात यांच्यासह गृहरक्षक दलातील अधिकारी व कर्मचाèयांनी बनसोड यांचे अभिनंदन केले आहे. हा सन्मान जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.