कारंजा लाड,
Samruddhi Highway accident, समृद्धी महामार्गावर चॅनल क्रमांक १६८ जवळ मंगळवार, १७ डिसेंबर रोजी पहाटे सुमारे ४ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात घटनास्थळीच एकाचा मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
प्राप्त माहितीनुसार Samruddhi Highway accident, एमएच ०३ के ४९१६ क्रमांकाचे वाहन मुंबईहून उत्तर प्रदेशकडे जात असताना अपघातग्रस्त झाले. अपघाताची माहिती श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांनी तात्काळ समृद्धी महामार्ग टोल प्लाझा कारंजा येथील १०८ रुग्णवाहिका पायलट सोनू शिंदे व डॉ. गणेश यांना दिली. त्यानंतर शिवनी १०८ रुग्णवाहिकेचे पायलट प्रतीक चाकट यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन गंभीर जखमी रुग्णाला कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी रुग्णाला अमरावती येथे रेफर करण्यात आले. मृतकाचे नाव मोहम्मद असलम खान (वय ४०) तर जखमी रुग्णाचे नाव मोहम्मद मुस्लिम (वय ४०), फातिमा मोहम्मद (वय ५२), कंमरू निसा शेख (वय ५५) सर्व राहणार नालासोपारा मुंबई अशी आहेत. दरम्यान, अपघातस्थळी मदतकार्याकरिता समृद्धी रुग्णवाहिकेचे अजय घोडेस्वार, शिवनेरी रुग्णवाहिकेचे विनोद खोंड व श्याम घोडेस्वार, कक्षसेवक विजय सिरसाठ, शिवम खोड, अग्निशामक दल (समृद्धी महामार्ग, कारंजा) तसेच महामार्ग पोलिस उपस्थित होते.
वैद्यकीय अधीक्षकानी लक्ष देण्याची गरज
कारंजा उपजिल्हा रुग्णालयातील कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकारी हे अपघातातील रुग्ण अति गंभीर असताना सुद्धा आपल्या मर्जीप्रमाणे त्यांना रेफर करतात. अपघातातील रुग्णांना गोल्डन अवर मध्ये मोट्या हॉस्पिटल ठिकाणी नेणे आवश्यक असतानाही त्यांच्या मर्जीप्रमाणे एक ते दीड तास १०८ रुग्णवाहिकेची वाट पाहायला सांगतात. अशा वेळेस अपघातील रुग्ण येथेच अति गंभीर होतात व ते गॅस पिन मध्ये जातात. असे बरेच प्रकार डॉटर कर्तव्यावर असतांना होत असतात. त्याकडे कारंजा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी लक्ष देण्याचे गरज आहे.