म्हणे...तुम्ही अमित शहांचे टेस्टट्युब बेबी...

संजय राऊतांच्या पुन्हा तोल गेला

    दिनांक :17-Dec-2025
Total Views |
मुंबई,
Sanjay Raut's statement मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण गरम झालं असून, या दरम्यान शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं आहे. दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर पत्रकारांशी बोलताना राऊतांनी शिंदे आणि भाजपवर थेट निशाणा साधला. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, ठाकरे बंधू आतापर्यंत कितीवेळा एकत्र आले, एकमेकांच्या घरी गेले, चर्चा केली, आणि आता अचानक एकत्र येणं म्हणजे काय?
 
 
sanjay raout
राऊतांनी शिंदे गटाच्या सभांना संदर्भित करत म्हटले, आता यांना बुडबुडे यायला लागले आहेत. पूर्वी फक्त शिवसेनेच्या सभाच होत्या, मग ती सुरुवात असो किंवा सांगता. शिवतीर्थाशी शिंदे गटाचा काय संबंध? अमित शाह यांनी पक्ष तुमच्या ताब्यात दिला तर तुमचा शिवतीर्थाशी काही संबंध नाही. तुम्ही अमित शाह यांचे टेस्ट ट्युब बेबी आहात, तुमचा जन्म नैसर्गिक नाही. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाचे डॉक्टरांनी एकत्र येऊन तुम्हाला तात्पुरते जन्म दिले. त्यामुळे शिवतीर्थावर सभा घेऊ नका.
 
संजय राऊत यांनी भाजपला झोडपून विचारले की, भाजपने शिवतीर्थावर कधी सभा घेतल्या आहेत? तसेच, शिवतीर्थाचा संबंध हा ठाकरेंचाच आहे, असे त्यांनी जोर देत सांगितले. मनसेने केलेली सभा मागणी नैतिक आणि भावनिकदृष्ट्या योग्य आहे, तर भाजप आणि शिवसेना युतीच्या बाबतीत टप्पाटप्पाच खेळ होत आहे, असा टोला त्यांनी लगावला. राऊतांनी स्पष्ट केले की, शिंदे गटाची शिवसेना आणि भाजपसोबतची युती म्हणजे अमित शाह यांनी लादलेलं लग्न आहे. मनाने ते मोडलेलं आहे. ही वधू, शिंदे, काही करुन भाजपच्या चरणाशी बसायचं आहे. यातूनच सगळा गोंधळ सुरू झाला आहे.” त्यांनी ठाकरे शैलीत जोरदार टीका करत भाजप आणि शिंदे गटाला निशाण्यावर ठेवले.