नवी दिल्ली
The Luthra brothers cried in court गोव्यातील बर्च नाईट क्लब घटनेतील आरोपी लुथरा बंधूंना मंगळवारी थायलंडहून भारतात आणण्यात आले. काल त्यांना पटियाला हाऊस कोर्टात हजर केले गेले, जिथे न्यायालयाने त्यांना दोन दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मंजूर केला. आज गोवा पोलिस विमानाने त्यांना गोव्यात घेऊन जाऊन सविस्तर चौकशी करतील. आतापर्यंत मिळालेल्या कागदपत्रांवरून आणि जबाबांवरून या प्रकरणातील अनेक महत्त्वाचे तथ्य समोर येण्याची शक्यता आहे.

६ डिसेंबरच्या रात्री गोव्यातील बर्च नाईट क्लबमध्ये भीषण आग लागली होती, ज्यात २५ जणांचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर लुथरा बंधू थायलंडकडे पळून गेले होते, जिथे त्यांना अटक करण्यात आली आणि पासपोर्ट रद्द करण्यात आले. नंतर त्यांना भारतात परत आणले गेले. गोवा विमानतळावर लुथरा बंधू डोके टेकवून बसले होते, त्यांच्यासोबत पोलिस अधिकारी उपस्थित होते. फोटो काढण्यापासून वाचवण्यासाठी त्यांनी डोके टेकले होते. तत्पूर्वी, पटियाला हाऊस कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा त्यांच्या कुटुंबियांना भेटले, तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले आणि त्यांनी स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही.
उत्तर गोव्यातील अर्पोरा गावातील "बर्च बाय रोमियो लेन" नाईट क्लबचे सह-मालक सौरभ आणि गौरव लुथरा यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई ६ डिसेंबर २०२५ रोजी लागलेल्या भीषण आगीशी संबंधित आहे. आगीमुळे नाईटक्लबमधील लाकडी छत जळून संपूर्ण परिसरात आग पसरली आणि पर्यटक व कर्मचाऱ्यांसह २५ लोकांचा मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच लुथरा बंधू पहाटे दिल्लीहून थायलंडकडे पळाले होते.