चिचाळा येथे रात्रभर तीन अस्वलांचा हैदोस

*एक नागरीक गंभीर *एका अस्वलाला वनविभागाने जेरबंद केले

    दिनांक :17-Dec-2025
Total Views |
मूल,
three bears wreaked तालुक्यातील चिचाळा येथे मंगळवारी तीन अस्वलांनी प्रवेश करून रात्रभर हैदोस घेतला. या अस्वलाच्या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला. या तीन अस्वलापैकी एका अस्वलाला वन कर्मचार्‍यांनी जेरबंद केले, तर उर्वरित दोन अस्वल पळून गेले. तालुक्यातील चिचाळा येथे मंगळवारी रात्री 12.30 वाजताच्या सुमारास तीन अस्वलींनी गावात व गावातील मुख्य शिवाजी चौकात प्रवेश केला. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली. या अस्वलांनी सर्वप्रथम गावातील सुरेश कुनघाडकर (50) यांच्या अंगणात प्रवेश केला. त्यामुळे अंगणातील पडवीमध्ये बांधलेली गुरे ओरडायला लागली. घरमालक सुरेश कुनघाडकर गुरांना वाचविण्यासाठी घराबाहेर पडले असता एका अस्वलाने त्यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले. जखमी कुनघाडकर यांना मूल उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी भरती केले. परंतु अंगावरील जखमा खोल व गंभीर असल्यामुळे त्यांना नागपूर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आलेले आहे.
 
 
 
चंद्रपूर अस्वल
 
ग्रामस्थांनी गावात शिरलेल्या अस्वलांना जंगलाकडे पळवून लावण्यासाठी फटाके फोडून आणि जोरजोरात ओरडत त्या पळवून लावण्याचा प्रयत्न केला. परंतू त्या अस्वलांनी गावात हैदोस घातला आणि गावातच ठिय्या मांडला यामुळे नागरिक चांगलेच घाबरले होते. नागरिकांनी याची माहिती वनविभागाला दिली असता वनाधिकारी व कर्मचारी चिचाळा येथे पोहोचले. तीन अस्वलापैकी एका अस्वलाला जेरबंद करण्यात वन कर्मचार्‍यांना यश आले. तर उर्वरित दोन अस्वल पळून गेले.
मूल तालुक्यात एकीकडे वाघाच्या हल्ल्याची वाढती प्रकरणे तर दुसरीकडे अस्वलांचा वाढता धुमाकूळ यांमुळे शेतकरी व नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाली असून, याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांच्या सुरक्षीततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.three bears wreaked सध्या धान कापणी व कापूस वेचणीचा हंगाम सुरू असल्यामुळे वनविभागाने जंगली हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा व शेतकरी व नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी चिचाळा परिसरातील नागरिकांनी केली आहे.