खोटे प्रमाणपत्र; ६५ कंत्राटदारांवर कारवाई सुरू

    दिनांक :17-Dec-2025
Total Views |
वर्धा, 
fake-certificate-contractor : बांधकाम कामगारांना ६५ ठेकेदार व कंत्राटदारांनी ९० दिवसांचे बोगस खोटे प्रमाणपत्र सादर केल्या प्रकरणी सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातर्फे नोटीस बजावून त्यांच्या विरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे.
 
 
FAKE
 
 
यापैकी काही कंत्राटदारांनी आमच्या सही व शियांचा गैरवापर केला असल्याचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालयास लेखी निवेदन दिले असल्यामुळे कार्यालयाच्या वतीने कंत्राटदारांचे ९० दिवसांचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. उर्वरित काही ठेकेदारांवरही कारवाई करण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील दलाल, एजन्ट, कंत्राटदार व काही संघटनांचे धाबे दणाणले आहे. तसेच कंत्राटदाराने ज्या कामगारांना प्रमाणाबाहेर नियमबाह्य पद्धतीने ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र दिले आहे त्या कंत्राटदारांवर सुद्धा फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
 
 
ग्रामपंचायत, नगरपरिषदतर्फे निर्गमित करण्यात आलेल्या ९० दिवस प्रमाणपत्रात कंत्राटदाराकडे १० पेक्षा जास्त कामगार काम करतात त्यांनी आस्थापनेची नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच काही ९० दिवसांच्या प्रमाणपत्रावर पोलिस अधीक्षकांमार्फत देखील कारवाई सुरू आहे, असे सरकारी कामगार नोंदणी अधिकारी सचिन अरबट व रीना पोराटे यांनी कळविले आहे.