वर्धा,
saraswati-vidya-mandir : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त विद्याभारती द्वारे शाळांमध्ये माता पालकांकारिता सप्तशक्ती संगम उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने स्थानिक सरस्वती विद्या मंदिर वर्धा येथे कार्यक्रम घेण्यात आला.
अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालक अपणार्र् हरदास होत्या. तर प्रमुख वता म्हणून प्रमुख वता म्हणून धर्मजागरण महिला कार्य अमरावती विभाग संयोजिक प्रज्ञा देशमुख होत्या. तसेच नेहा देशपांडे, अपर्णा वंजारी यांची उपस्थिती होती.
प्रमुख वता प्रज्ञा देशमुख यांनी महिलांनी परिवारासोबतच समाज व राष्ट्र कार्यात योगदान द्यावे. घरातील दैनंदिन व्यवहारांमध्ये सामाजिक समरसता, पर्यावरण, स्वदेशी आचरणकरून राष्ट्रकार्यात योगदान द्यावे असे आवाहन केले. नेहा देशपांडे यांनी कुटुंब प्रबोधन तर अपर्णा वंजारी यांनी पर्यावरण विषयी मार्गदर्शन केले.
संचालन श्वेता मुळे यांनी केले तर आभार समृद्धी ठाकरे यांनी मानले. यावेळी प्राचार्य ममता विंचूरकर व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते