वर्धेच्या प्रभाग ९ मतदार यादीत त्रुट्या कायमच

    दिनांक :17-Dec-2025
Total Views |
वर्धा, 
voter-list-errors : आक्षेपांच्या अपिली न्यायालयाने वेळीच निकाली न काढण्याचे कारण पुढे करीत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार वर्धा नगरपालिकेच्या प्रभाग ९ ‘ब’ आणि प्रभाग १९ ‘ब’ या नगरसेवकांच्या दोन पदांसाठी २० रोजी मतदान होणार असले तरी प्रभाग ९ च्या मतदार यादीत त्रुट्या असल्याचे पुढे आले आहे.
 
 
KL
 
 
 
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार देवळी पालिकेची संपूर्ण निवडणूक तर वर्धा येथील प्रभाग ९ ‘ब’ व प्रभाग १९ ‘ब’, हिंगणघाट येथील प्रभाग ५ ‘अ’ व ‘ब’ तसेच प्रभाग ९ ‘अ’ तर पुलगाव येथील प्रभाग २ ‘अ’ व प्रभाग ५ ‘अ’ ची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. संबंधित निवडणुकीचा महत्त्वाचा भाग म्हणजे मतदान प्रक्रिया रविवार २० रोजी होणार असून मतमोजणी २१ डिसेंबरला जिल्ह्यात सहा वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे. पण वर्धा येथील मतदार यादीत अजूनही सावळा गोंधळ कायम असल्याचे चित्र बघावया मिळत आहे. वर्धा येथील प्रभाग ९ मधील मतदार यादीत अनुक्रमांक ५७३ वर मतदान कार्ड क्रमांक एस. डब्लू. डी. ८२६१०३४, वय ३४ व लिंग पुरूष असे प्रामुख्याने नमुद करण्यात आले आहे. पण. मतदाराचे नाव, मतदाराचे छायाचित्र नाही. तर याच यादीत अनुक्रमांक ५७६ वर मतदाराचे ‘अभिषेक’ असे नाव, ‘योगेश’ असे वडिलांचे नाव, वय १९, लिंग पुरुष असे लिहून आहे. पण संबंधित मतदाराचे आडनाव नमुद करण्यात आलेले नाही. त्यामुळे अनेकाकडून आश्चर्यच व्यक्त केले जात आहे.