गोपुरी चौक ते साटोडा मार्गच्या ठेकेदारला प्रतिकात्मक श्रद्धांजली

    दिनांक :18-Dec-2025
Total Views |
वर्धा,
A symbolic tribute to the contractor साटोडा,आलोडी,नालवाडी, येथील नागरिकांनी पंतप्रधान ग्राम सडक योजने द्वारे काम घेणाऱ्या ठेकेदाराला प्रतिकात्मक श्रद्धांजली तसेच कुंभाकर्णा सारख्या झोपी गेलेल्या बांधकाम विभाग वर्धा चे अभियंते यांना जागे करण्यासाठी ही प्रतिकात्मक श्रद्धांजली चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गोपुरी चौक ते साटोडा पर्यंतचा रोडचे बांधकाम 2024 च्या विधानसभा निवडणुकी पूर्वी मंजूर झाली आहे.परंतु दोन वर्ष उलटून सुद्धा हा मार्ग सामान्य जनतेच्या प्रतीक्षेतच आहे. गोपुरी ते साटोडा हा 3 किलोमीटरचा रोड चे ठेकेदार आणि बांधकाम विभागाचे अभियंते यांनी हा रोड बांधण्यासाठी हाती घेतला पण आतापर्यंत फक्त 200 मीटर च्या रोड चे काम झाले आहे... संबंधित ठेकेदार यांनी काही ठिकाणी सिमेंट काँक्रीट चा पहिला थर टाकला पण त्यावर पाणी न मारल्यामुळे रस्त्यावरील गिट्टी उघडी पडून धुळीचे साम्राज्य तयार झाले आहे.
 
 

A symbolic tribute to the contractor
 
 
जागोजागी खड्डे तसेच गिट्टी उघडी पडल्यामुळे लोकांना पाठीचे.. श्वासनाचे तसेच गिट्टी वरून टू व्हीलर घसरून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या मार्गाने महाकाळ. साटोडा आलोडी नालवाडी गावातील नागरिक ये जा करतात.. शालेय विद्यार्थी जीव मुठीत घेऊन सायकलने प्रवास करतात. या रस्त्यावर फिरायला गेले असता वयस्क व्यक्तीचा अपघात होऊन मृत्यू सुद्धा झाला आहेत.. परंतु अजूनही या रस्त्याने कुठल्याही स्थानिक प्रतिनिधीचे लक्ष नाही. गावाकऱ्यांनी जिल्हाधिकारी, बांधकाम विभाग तसेल आमदारांना संबंधित रस्ता लवकर तयार करण्यात यावा यासाठी निवेदन सुद्धा दिले परंतु निगरगट्ट प्रशासन झोपी गेल्याचे सोंग घेत आहे.यनिमित्त ठेकेदार आणि बांधकाम विभागाचे लक्ष जावे आणि हा रोड तात्काळ पूर्ण व्हावा यासाठी साटोदा गावाचे सरपंच गौरवभाऊ गावंडे. वर्धा कृषी बाजार समिती अध्यक्ष अमितभाऊ गावंडे. ग्रामपंचायत सदस्य नरेश होनाडे. संदीप मारवाडी. प्रवीण नागोसे. गणेशभाऊ ढवळे. ज्ञानेश्वर जवादे. नितीन पचारे. बिपीन कठाणे. सूरज तेलरांधे. रमेश लाडेकर. बिरजू डोंगरे विनोद सायरे यांनी ठेकेदार याचा भावपुर्ण श्रद्धांजली चा फलक लावून त्या समोर मेणबत्ती लावून निषेध नोंदवीला.