अजनी - वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

येत्या २६ डिसेंबरपासून सुधारणा लागू होणार

    दिनांक :18-Dec-2025
Total Views |
नागपूर,
ajni-vande-bharat-express : प्रवाशांच्या सोयी सुविधा अधिक सक्षम करण्याच्या द़ृष्टीने तसेच रेल्वे वाहतुकीची वेळ क्षमता सुधारण्याच्या उद्देशाने गाडी क्रमांक २६१०१ पुणे - अजनी वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकात अंशतः सुधारणा करण्यात आली आहे. ही गाडी आठवड्यातून ६ दिवस अजनी ते पुणे दरम्यान धावते.
 
 
vande bharat
 
 
 
मध्य रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक २६१०१ पुणे - अजनी वंदे भारत एक्सप्रेस नागपूर विभागातील अजनी स्थानकांवर पूर्व निश्चित वेळेपेक्षा धावेल. सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी अकोला, बडनेरा आणि वर्धा स्थानकांवर आगमन व प्रस्थान काही मिनिटे आधी करेल, ज्यामुळे प्रवाशांना उत्तम कनेक्टिव्हिटीसह वेळेची बचत होणार आहे.
 
 
मुख्यत: ही सुधारणा २६ डिसेंबरपासून लागू होणार असून वेळापत्रकानुसार गाडी अकोला आणि बडनेरा स्थानकांवर सुमारे १० मिनिटाआधी तर वर्धा स्थानकावरही पूर्व निश्चित वेळेपेक्षा आधी व प्रस्थान करेल. या बदलामुळे गाडीची एकूण वेळ पालन क्षमता तसेच परिचालन कार्यक्षमता अधिक बळकट होणार आहे.