वाशीम,
Chandrashekhar Bawankule वाशीम नगर परिषद पदाचे अध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवाराचे प्रचारार्थ राज्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व माजी मंत्री आ. संजय कुटे यांच्या संवाद सभेचे आयोजन १९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता देशमुख ले आऊट पोस्ट ऑफीस जवळ वाशीम येथे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला जास्तीत जास्त संख्येने मतदार बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टी वाशीम जिल्हा व शहराच्या वतीने करण्यात आले आहे.
वाशीम नगर परिषदेचे नगराध्यक्षपदाचे भाजपा उमेदवार अनिल केंदळे व १६ प्रभागातील ३२ नगरसेवक पदासाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. वाशीम नगर परिषदेचे अध्यक्षपद हे ओबीसी सर्वसाधारण पदासाठी राखीव आहे. त्यासाठी अध्यक्षपदासाठी अनिल केंदळे हे निवडणुक रिंगणात आहेत. वाशीम नगर परिषदेवर भाजपाची सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपा पक्षाचे सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते जोमाने प्रचारात उतरले आहेत. आ. श्याम खोडे, निवडणुक प्रभारी म्हणून राजू पाटील राजे यांनी जास्तीत जास्त भाजपा पक्षाचे उमेदवार निवडुण आणण्यासाठी आपले राजकीय कौशल्य पणाला लावले आहे. त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे हे सुध्दा खांद्याला खांदा लावून जोमाने काम करीत आहेत.
विकसित वाशीम Chandrashekhar Bawankule नगरीसाठी संवाद सभा आयोजित केली असून, या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री तथा विद्यमाान आ. संजय कुटे, आ. श्याम खोडे यासह भाजपा पक्षाचे आजी, माजी आमदार, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी वाशीम शहरातील जास्तीत जास्त मतदार बांधवांनी या संवाद सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन वाशीम शहर भाजपा शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.