कंत्राटदाराला वाहिली प्रतिकात्मक श्रद्धांजली

    दिनांक :18-Dec-2025
Total Views |
वर्धा, 
wardha-news : साटोडा, आलोडी, नालवाडी येथील नागरिकांनी पंतप्रधान ग्राम सडक योजनेद्वारे काम घेणार्‍या कंत्राटदाराला तसेच कुंभकर्णी झोपेत असलेल्या बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना जागे करण्यासाठी ही प्रतिकात्मक श्रद्धांजली वाहण्यात आली.
 
 
 
ghh
 
गोपुरी चौक ते साटोडा पर्यंतच्या रस्त्याचे बांधकाम २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मंजूर झाले. परंतु, दोन वर्ष उलटूनसुद्धा हा रस्ता अपूर्णच आहे. गोपुरी ते साटोडा हा ३ किमीचा रस्ता कंत्राटदार आणि बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी बांधकामासाठी हाती घेतला. मात्र, आतापर्यंत फत २०० मीटरच्या रस्त्याचेच काम झाले आहे. संबंधित कंत्राटदाराने काही ठिकाणी सिमेंट काँक्रिटचा पहिला थर टाकला पण त्यावर पाणी न मारल्यामुळे रस्त्यावरील गिट्टी उघडी पडून धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. जागोजागी खड्डे तसेच गिट्टी उघडी पडल्यामुळे वाहनधारकांना पाठीचे, श्वसनाचे तसेच गिट्टीवरून दुचाकी घसरून अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
 
 
या मार्गाने महाकाळ, साटोडा, आलोडी, नालवाडी गावातील नागरिक ये-जा करतात. शालेय विद्यार्थी जीव मुठीत घेऊन सायकलने प्रवास करतात. रस्त्यावर फिरायला गेले असता ज्येष्ठ नागरिकाचा अपघात होऊन मृत्यू सुद्धा झाला आहे. परंतु, अजूनही या अपूर्ण रस्त्याकडे कुठल्याही स्थानिक प्रतिनिधीचे लक्ष नाही. नागरिकांनी जिल्हाधिकारी, बांधकाम विभाग तसेल आमदारांना संबंधित रस्ता लवकर तयार करण्यात यावा, यासाठी निवेदन सुद्धा दिले. परंतु, निगरगट्ट प्रशासन झोपी गेल्याचे सोंग घेत आहे.
 
 
दरम्यान, कंत्राटदार आणि बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच हा रस्ता तत्काळ पूर्ण व्हावा यासाठी साटोडाचे सरपंच गौरव गावंडे, वर्धा कृषी बाजार समितीचे अध्यक्ष अमित गावंडे, ग्रापं सदस्य नरेश होणाडे, संदीप मारवाडी, प्रवीण नागोसे, गणेश ढवळे, ज्ञानेश्वर जवादे, नितीन पचारे, बिपीन कठाणे, सूरज तेलरांधे, रमेश लाडेकर, बिरजू डोंगरे, विनोद सायरे यांनी कंत्राटदाराच्या भावपूर्ण श्रद्धांजलीचा फलक लावून त्यासमोर मेणबत्ती लावून निषेध नोंदविला.