प्रत्येक तिसऱ्या रील्सवर ‌‘फासला‌’ची ‌‘एंट्री‌’

‌‘धुरंधर‌’चित्रपटाची धुन बलुचिस्तानपर्यंत व्हायरल

    दिनांक :18-Dec-2025
Total Views |
नागपूर,
dhurandhar movie सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असणारा चित्रपट म्हणजे ‘धुरंधर’ हा आहे. विशेषतः चित्रपटातील अक्षय खन्नाच्या दमदार एंट्री सीनने आणि त्यासोबत असलेल्या 'फासलाह' या गाण्याने इंस्टाग्रामला अक्षरशः ताब्यात घेतला आहे. रिल्स, स्टेटस आणि शॉर्ट व्हिडिओंमधून हे गाणे सर्वत्र ऐकू येत असून, इंस्टाग्रामवरील जवळपास प्रत्येक तिसरा व्हिडिओ हा धुरंधरच्या एंट्री साँगवर आधारित असल्याचे चित्र आहे. सध्या हा ट्रेंड सोशल मीडियावर ‘नंबर वन’ स्थानावर विराजमान झाला आहे. अक्षय खन्नाच्या रुबाबदार उपस्थितीसोबत येणाऱ्या या एंट्री गाण्यात अरबी भाषेतील ओळी “या अखी डस डस इंदी खोश फसलाह, या अखी ट्फुज़ ट्फुज़ वल्लाह खोश रक़्साह” यांचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. शब्दांचा अर्थ अनेकांना माहिती नसला, तरी त्यातील ताल, ऊर्जा आणि रहस्यमय ढंगाने तरुणाईला भुरळ घातली आहे. परिणामी, व्हॉट्सअॅप स्टेटसपासून इंस्टाग्राम रिल्सपर्यंत ‘फसला’ या एंट्री साँगचाच माहोल दिसून येत आहे.
 

dhurandhar movie  
५ डिसेंबर रोजी dhurandhar movie  प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ची क्रेझ आता केवळ भारतापुरती मर्यादित राहिलेली नसून यातील 'फासला' या गाण्याचा प्रभाव थेट पाकिस्तान आणि बलुचिस्तानपर्यंत पोहोचला आहे. तेथील तरुणही 'फासला' च्या तालावर नाचत व्हिडिओ तयार करत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये बलुचिस्तानमधील तरुण अक्षय खन्नाच्या स्टाइलमध्ये नृत्य करताना दिसतो, ज्याला नेटकाऱ्यांकडून मोठी दाद मिळत आहे. नृत्यदिग्दर्शक विजय गांगुली यांच्या मते, हे गाणे रहमान डकैत या पात्राच्या ‘शेर-ए-बलुच’ म्हणून होणाऱ्या भव्य प्रवेशाचे प्रतीक आहे. अक्षय खन्नाच्या उत्स्फूर्त नृत्यामुळे या दृश्याला वेगळीच उंची मिळाली. दरम्यान,‘धुरंधर’ने बॉक्स ऑफिसवर २०० कोटींहून अधिक कमाई करत यशाची घोडदौड सुरू ठेवली असून, पडद्याबरोबरच डिजिटल विश्वातही हा चित्रपट चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.