मुंबई,
Dino Morea father death प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता डिनो मोरियाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. डिनो मोरियाचे वडील रॉनी मोरिया यांचे निधन झाले आहे. या दुःखद घटनेची माहिती डिनोने आपल्या सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करून दिली.
‘राज’ आणि ‘हॅपी न्यू इयर’ सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलेला डिनो मोरिया आपल्या वडिलांशी खूप जवळचा होता. आपल्या पोस्टमध्ये त्याने वडिलांचे निधन कधी आणि कसे झाले याची माहिती दिलेली नाही, परंतु त्याने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि शिकवलेल्या जीवनमूल्यांचे कौतुक भावपूर्ण शब्दांत केले आहे.
डिनोने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, “प्रत्येक दिवस आनंदाने जगा, दररोज हसत राहा आणि तुम्ही जे काही करता ते मनापासून करा. व्यायाम करा, निसर्गाचा आणि सूर्यप्रकाशाचा आनंद घ्या, चांगले अन्न खा, पर्वत आणि समुद्रकिनारी फिरा. कठोर मेहनत करा, सर्वांसोबत हसत खेळत रहा, सर्वांवर प्रेम करा. माझ्यासाठी हे सर्व एकाच व्यक्तीमध्ये साकारले होते; माझे मार्गदर्शक, माझे नायक, माझे वडील. बाबा, मला हे जीवनाचे धडे शिकवल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला सर्वांना तुमची खूप आठवण येत आहे.”
डिनोने पुढे लिहिले, Dino Morea father death “मला खात्री आहे की तुम्ही कुठेही असलात तरी, तुम्ही लोकांना एकत्र केले असेल, सर्वजण तुमच्यासोबत हसत आणि नाचत असतील. जोपर्यंत आपण पुन्हा भेटूत नाहीत तोपर्यंत असेच आनंदी राहा. लव्ह यू पापा.”डिनो मोरियाने अक्षय कुमारच्या ‘हाऊसफुल 5’ चित्रपटात काम केले असून, आता तो अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणाऱ्या लोकप्रिय मालिका ‘फोर मोअर शॉट्स प्लीज’ च्या सीझन 4 मधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रॉनी मोरियाच्या निधनाने डिनोच्या चाहत्यांमध्ये आणि चित्रपटसृष्टीतही भावनिक वातावरण निर्माण झाले आहे.