कत्तलखान्यावर बुलडोझरने व दोषींवर कठोर कारवाई करा

बजरंग दल, विहिंपचे प्रशासनाला निवेदन

    दिनांक :18-Dec-2025
Total Views |
तिरोडा,
illegal slaughterhouse, शहरात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यावर बुलडोझरने विध्वसांत्मक कारवाई करून गोवंशी तस्करी करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेने तहसीलदार व पोलिस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
 

illegal slaughterhouse,  
विहिंप व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी १४ डिसेंबर रोजी पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने शहरातील झाकीर हुसेन वॉर्ड येथील अवैध कत्तलखान्यावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत एक ते दीड क्विंटल कापलेले गौमांस तसेच १४ गौवंश जप्त करण्यात आले. जप्त केलेले जीवंत गौवंश सुरक्षितपणे गौशाळेत पाठविण्यात आले असून संबंधित आरोपींवर कायद्यानुसार गुन्हे दाखल करून कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अवैध गौकत्तल व गौतस्करी करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, या गंभीर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद— व बजरंग दलाच्या पदाधिकार्‍यांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षक महोदय यांना लेखी निवेदन देऊन अवैध कत्तलखान्यावर बुलडोझरद्वारे तात्काळ विध्वंसात्मक कारवाई करण्याची ठाम मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच तिरोडा नगर परिषद हद्दीत सुरू असलेल्या बेकायदेशीर व नियमबाह्य बांधकामांबाबतही संघटनांच्या व नागरिकांच्या वतीने मुख्याधिकारी, नगर परिषद तिरोडा यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. संबंधित ठिकाणी कोणतीही अधिकृत परवानगी नसताना अवैध कत्तलखाना सुरू असल्याने शहर नियोजन, कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, अवैध कत्तलखान्यावर बुलडोझरद्वारे कारवाई करून तो पूर्णतः उध्वस्त करण्यात येईल, तसेच सदर प्रकरणात दोषी आढळणार्‍या सर्व व्यक्तींवर कायद्याच्या चौकटीत कठोर कारवाई करण्यात येईल, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
 
 
अन्यथा निर्णायक आंदोलन...
जर दिलेल्या आश्वासनानुसार illegal slaughterhouse एका आठवड्याच्या आत अवैध कत्तलखाना पूर्णतः उध्वस्त करण्यात आला नाही, तर बजरंग दल व विश्व हिंदू परिषद यांच्यावतीने तीव्र, व्यापक व निर्णायक आंदोलन छेडले जाईल. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. गौमातेच्या रक्षणासाठी आणि अवैध कत्तलखान्यांना कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी बजरंग दल कोणतीही तडजोड करणार नाही, असा ठाम निर्धार यावेळी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला.