अकोल्यात बिबट्यासह चार पिल्ले दिसल्याने खळबळ

वनविभागाची तातडीने रेस्क्यू मोहीम सुरू

    दिनांक :18-Dec-2025
Total Views |
अकोला,
leopard and four cubs in Akola अकोल्यातील कसूरा गावाजवळ बिबट्यासह चार पिल्ले फिरताना आढळले आहेत. या दरम्यान, बिबट्याचे एक पिल्लू शेतकऱ्यांच्या हाती लागले, तर उर्वरित तीन पिल्ले जंगलात निघून गेले. पिल्लू सध्या अकोला वन विभागाच्या ताब्यात असून, त्याची शारीरिक तपासणी करून नंतर सुरक्षित जंगलात सोडण्याची तयारी आहे. माजी सरपंच विठ्ठल दही यांनी या घटनेची माहिती अकोला वन विभाग व उरळ पोलिसांना दिली. तत्पश्चात वन विभागाचे अधिकारी आणि उरळ पोलिस स्टेशनचे कर्मचारी कसूरा गावात दाखल झाले.
 
 
leopard and four cubs in Akola
बिबट्यासह पिल्ले आढळलेला परिसर अकोला ते शेगाव दिंडी मार्गाजवळ असून, येथे रस्त्यावर कायम मोठी गर्दी असते. परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने वनविभागाने तातडीने रेस्क्यू टीम तैनात केली आहे. वनपाल गजानन गायकवाड यांनी सांगितले की, पिल्लूची शारीरिक तपासणी झाल्यानंतर तो सुरक्षितपणे जंगलात सोडला जाईल. उर्वरित तीन पिल्ल्यांचा शोध सुरू आहे. ही घटना काल रात्री घडली असून, परिसरातील सुरक्षा आणि पिल्ल्यांच्या संरक्षणासाठी वनविभाग सतर्क आहे.