'पप्पा… पप्पा…'शहीद वडिलांच्या शवपेटीजवळ चिमुकलीची हाक! video

    दिनांक :18-Dec-2025
Total Views |
जम्मू,
Martyr Constable Amjad Ali Khan जम्मू-काश्मीरमधील उधमपूरच्या माजलता येथे हुतात्मा झालेल्या कॉन्स्टेबल अमजद अली खान यांच्यावर बुधवारी पूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. हुतात्मा जवानाचा मृतदेह घरी पोहोचताच हृदय पिळवटून टाकणारे दृश्य पाहायला मिळाले. अवघ्या एक वर्षांची त्यांची चिमुकली मुलगी वडिलांना अखेरचा निरोप देण्यासाठी शवपेटीजवळ आली. आपल्या वडिलांचा मृतदेह पाहताच ती “पप्पा… पप्पा…” अशी हाक मारत राहिली, मात्र वडील काहीच प्रतिसाद देत नसल्याचे पाहून उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले.
 
 

Martyr Constable Amjad Ali Khan
 
शवपेटीत ठेवलेला अमजद खान यांचा मृतदेह घरी आणण्यात आला तेव्हा कुटुंबीयांसह परिसरात शोककळा पसरली होती. वडिलांना ओळखून त्यांना उठवण्याचा प्रयत्न करणारी ती चिमुकली आपल्या वडिलांना पुन्हा कधीच जागे होता येणार नाही, याची जाणीव नसलेली दिसत होती. तिच्या त्या हाकांनी आणि निरागस प्रेमाने अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या प्रत्येकाचे मन हेलावून गेले. हा भावनिक प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला असून संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
 
 
 
दरम्यान, हुतात्मा होण्यापूर्वीचा अमजद खान यांचा आणखी एक व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओत ते बेडवर झोपलेले असून हळूच गाणे गुणगुणताना दिसतात. गाण्याचा ताल आणि सुरांवर लक्ष केंद्रित करत असलेले अमजद खान यांचे ते दृश्य अनेकांना भावूक करत आहे. कॉन्स्टेबल अमजद अली खान हे दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान शहीद झाले.