मुंबई,
Mumbai High Court bomb threat मुंबईमध्ये उच्च न्यायालयासह इतर सर्व न्यायालयांना बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी मिळाल्यामुळे खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवरून ई-मेलद्वारे धमकी मिळाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने पावले उचलली.
पोलिसांनी कोर्ट परिसर Mumbai High Court bomb threat रिक्त करण्याचे आदेश दिले आणि बॉम्बशोधक पथक त्वरित पाचारण करण्यात आले. तपासणीत कोणतीही धोकादायक वस्तू आढळली नाही आणि नंतर उच्च न्यायालयात कामकाज सुरळीत सुरु करण्यात आले. पोलीस सूत्रांनी सांगितले की, धमकी ई-मेलमध्ये फक्त उच्च न्यायालय नव्हे तर “सर्वच न्यायालय बॅाम्बने उडवून देऊ” असे म्हटले होते.मुंबई पोलिसांच्या माहितीप्रमाणे, धमकी पाठवणाऱ्याचा आणि ई-मेलमधील तथ्यांचा सविस्तर तपास सुरु आहे. अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून कोर्ट परिसरात पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची उपस्थिती वाढवण्यात आली आहे.यासारखीच धमकी दोन आठवड्यांपूर्वी मिरारोडमधील एका खासगी शाळेला देखील मिळाली होती. १ डिसेंबर रोजी सकाळी सुमारे ६ वाजता सिंगापूर इंटरनॅशनल शाळेला बॉम्बस्फोटाची धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली होती. त्यावेळी बॉम्बशोधक पथकाने शाळेची तपासणी केली असता कोणतीही धोकादायक वस्तू आढळली नाही.
देशभरात घडलेल्या कारमधील स्फोटानंतर अशा प्रकारच्या धमक्यांचे ई-मेल आणि फोन काही संस्थांना येत आहेत. त्यामुळे मुंबईतील न्यायालयांमध्ये सुरक्षा उपाय वाढवणे आवश्यक ठरले आहे.