नागपूर,
National Service Scheme राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत दत्ता मेघे आयुर्वेद महाविद्यालयाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुर्वेदिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ. हर्षला राजुरकर यांनी धन्वंतरी पूजनाने केले.
डॉ. धीरज झाडे यांनी औषधी वनस्पतींचे महत्त्व सांगितले.National Service Scheme डॉ. संतोष पुसदकर यांनी नाडी परीक्षण व उपचार केले. डॉ. वासवी तोटावार, डॉ. स्नेहा बोरकर, डॉ. अनघा गोसावी व डॉ. आश्लेषा गुंडरे यांनी आरोग्य, योग व आयुर्वेदाबाबत मार्गदर्शन केले.शिबिरात १५० लाभार्थ्यांची तपासणी करून बीपी-शुगर चाचण्या तसेच मोफत औषधोपचार व समुपदेशन करण्यात आले.
सौजन्य:निकिता लुटे ,संपर्क मित्र