अरे देवा! निधी अग्रवालसोबत चाहत्यांची धक्काबुक्की video

व्हायरल व्हिडीओमुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

    दिनांक :18-Dec-2025
Total Views |
हैदराबाद,
Nidhhi Agerwal viral video प्रसिद्ध अभिनेत्री निधी अग्रवाल हिचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तिच्या आगामी चित्रपट ‘द राजा साब’मधील ‘सहना सहना’ या गाण्याच्या लाँचिंग कार्यक्रमानंतर हा प्रकार घडल्याचे या व्हिडीओमध्ये दिसून येते. कार्यक्रम संपवून बाहेर पडत असताना चाहत्यांच्या प्रचंड गर्दीने निधीला वेढले आणि काही काळ ती अक्षरशः गर्दीत अडकून पडली.
 

Nidhhi Agerwal viral video, Nidhhi Agerwal fans crowd incident, 
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये निधी कार्यक्रमस्थळाबाहेर येताच चाहते तिच्या भोवती जमल्याचे स्पष्टपणे दिसते. ऑटोग्राफ आणि सेल्फीसाठी चाहत्यांनी केलेल्या गर्दीमुळे परिस्थिती इतकी गंभीर झाली की, अभिनेत्रीला गाडीपर्यंत पोहोचण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. तिच्या अवतीभोवती बॉडीगार्ड असतानाही ती गर्दीत पूर्णपणे असहाय्य झालेली दिसत होती. काही जण तिच्याजवळ येऊन स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही दृश्यांमध्ये दिसून येते.
 
 
या संपूर्ण प्रसंगात निधी Nidhhi Agerwal viral video  स्वतःला आणि तिच्या गुलाबी रंगाच्या ऑफ-शोल्डर ड्रेसला सावरताना दिसत होती. बॉडीगार्डच्या मदतीने ती कशीबशी गाडीत बसण्यात यशस्वी झाली. गाडीत बसल्यानंतर ती सर्वप्रथम आपला ड्रेस नीट करताना दिसली. या घटनेनंतर निधी प्रचंड घाबरलेली आणि अस्वस्थ झालेली असल्याचेही व्हिडीओमध्ये स्पष्ट होते.हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, अनेक नेटकऱ्यांनी या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत चाहत्यांच्या अतीउत्साहावर नियंत्रण असावे, अशी मागणी केली जात आहे.
 
 
                                                                   सौजन्य सोशल मीडिया 
 
‘सहना सहना’ गाण्याचा लाँचिंग कार्यक्रम हैदराबादमध्ये पार पडला होता. ‘द राजा साब’ हा चित्रपट सुपरस्टार प्रभास याचा असून, तो 9 जानेवारी 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मारुती करत असून, प्रभास आणि निधी अग्रवालसोबत रिद्धी कुमार, संजय दत्त आणि मालविका मोहनन हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप उमटवलेल्या निधी अग्रवालसोबत घडलेला हा प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.