जोधपूर,
Stray dog attack in Jodhpur राजस्थानच्या जोधपूरमधून भटक्या कुत्र्यांच्या दहशतीचा एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे. प्रताप नगर शॉपिंग सेंटर परिसरातील हा व्हिडिओ गुरुवारी सकाळी एका महिला आणि पुरुषावर अचानक अनेक भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. महिला पळून जाण्यात यशस्वी झाली, परंतु तिची मदत करण्यासाठी आलेला व्यक्ती कुत्र्यांच्या हल्ल्यात अडकला.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येते की, कुत्रे महिला आणि एक व्यक्तीचा पाठलाग करत आहेत, तर तो व्यक्ती महिलेला वाचवण्याचा प्रयत्न करतो. दोघेही खाली पडतात, महिला घटनास्थळावरून पळून जाते, पण कुत्रे त्या व्यक्तीला पकडून दूर खेचतात. दरम्यान लोकांच्या हस्तक्षेपामुळे त्याचा जीव वाचला, परंतु तो गंभीर जखमी झाला.