नवी दिल्ली,
The West Indies squad announced क्रिकेट वेस्ट इंडिजने १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या संघाचे नेतृत्व जोशुआ डॉर्न करणार आहे, तर जोनाथन व्हॅन लँग उपकर्णधार म्हणून कार्य करणार आहे. २०२६ मध्ये जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये हे विश्वचषक स्पर्धा होणार आहे. वेस्ट इंडिजच्या १९ वर्षांखालील संघात १९ वर्षीय फलंदाज ज्वेल अँड्र्यूचा समावेश आहे, ज्याने वरिष्ठ राष्ट्रीय संघासाठी आधीच तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामने खेळले आहेत. क्रिकेट वेस्ट इंडिजचे हाय परफॉर्मन्स मॅनेजर ड्वेन गिल म्हणाले की संघाची निवड करताना खेळाडूंच्या विकासावर विशेष लक्ष दिले गेले असून, त्यांच्या नेतृत्वगुणांचा, रणनीतिक समजाचा आणि वैयक्तिक क्षमतेचा विचार करून संघ तयार करण्यात आला आहे. तसेच, खेळाडूंना उच्च दर्जाचे सामने अनुभवता यावे याची खात्री केली आहे.

श्रीलंका आणि इंग्लंडविरुद्ध झालेल्या युवा एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या काही खेळाडूंना १९ वर्षांखालील विश्वचषकात संधी देण्यात आली आहे. या मालिकांमध्ये डॉर्न सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला तर व्हॅन लँगनेही उत्कृष्ट कामगिरी केली. याशिवाय झॅकरी कार्टर, मॅथ्यू मिलर, जॅकेम पोलार्ड, शकुन बेले आणि विटेल लॉज यांनीही संघात स्थान मिळवले. श्रीलंका आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत, शकुन पोलार्डने १६.२७ च्या सरासरीने १८ बळी घेतले, शकुन बेलेने १५ बळी मिळवले, तर विटेल लॉजने सहा सामन्यांमध्ये १४ बळी घेतले.
२०२६ च्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजला गट डी मध्ये स्थान देण्यात आले असून, त्याच गटात दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि टांझानिया संघांचा समावेश आहे. वेस्ट इंडिज संघ १५ जानेवारी रोजी टांझानियाविरुद्धच्या मोहिमेने स्पर्धेची सुरुवात करेल. वेस्ट इंडिजच्या १९ वर्षांखालील विश्वचषक संघातील खेळाडूंची यादी: जोशुआ डॉर्न (कर्णधार), जोनाथन व्हॅन लँग (उपकर्णधार), ज्वेल अँड्र्यू, शामर अॅपल, शकुन बेली, झॅकरी कार्टर, तानेझ फ्रान्सिस, आर'जाई गिटेन्स, विटाले लॉज, मिका मॅकेन्झी, मॅथ्यू मिलर, मॉर्टन, जकीम पोलार्ड, एडेन राचा, कुणाल तिलोकानी.