वनिष घोसले यांना सरपंच पदावरून काढण्याचा आयुक्तांचा आदेश

    दिनांक :18-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
vanish-ghosle : पळसकुंड उमरविहीर ग्रामपंचायतचे सरपंच वनिष घोसले यांना 12 डिसेंबर रोजी सरपंच पदावरून काढण्याचा आदेश अपर आयुक्त, अमरावती यांनी पारित केल्याने गावकèयांनी समाधान व्यक्त केले आहे. उपसरपंच सुभाष शिंदे यांनी भ्रष्टाचार व गैरवर्तनाबाबत ग्रामपंचायत अधिनियम 1959 अंतर्गत आयुक्त यांच्याकडे अर्ज सादर केला होता. त्या नंतर अर्जावर यवतमाळ जिप मुख्य कार्यकारी अधिकाèयांकडून चौकशी करण्यात आली. चौकशीत बोगस ग्रामसभा व बेकायदेशीर ठराव पारित केल्याचे निष्पन्न झाले.
 
 

saoklp 
 
 
 
या चौकशीदरम्यान, सरपंच वनिष घोसले यांनी भ्रष्टाचार व गैरव्यवहार केल्याचे समोर आले. या चौकशी अहवालानंतर अपर आयुक्त अमरावती यांच्या पुढे सुनावणी व युक्तीवाद झाला. त्यानंतर हे प्रकरण आदेशासाठी ठेवण्यात आले होते. अखेर अपर आयुक्तांच्या पदावरून काढण्याच्या आदेशाने गावकèयांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. भ्रष्टाचारी सरपंचाला पदावरून दूर केल्याच्या निर्णयाचे स्वागत होत आहे. अर्जदाराच्या वतीने अ‍ॅड. वैभव पंडित, अ‍ॅड. मंगेश शेंडे, अ‍ॅड. निखिल लोंढे यांनी बाजू मांडली.
या प्रकरणात सरपंचाने जवळपास अठरा ते वीस लाख रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. पळसकुंड ग्रामपंचायत ही पेसा ग्रामपंचायत असल्याने प्रचंड निधीचा ओघ आहे. गरीब व अशिक्षीत आदिवासी बांधवांची पिळवणूक केल्याच्या अनेक तक्रारीसुद्धा वनिष घोसले यांच्या विरोधात आहे.