पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना ६ हजार ऐवजी मिळणार १२ हजार रुपये?

    दिनांक :19-Dec-2025
Total Views |
नवी दिल्ली,  
pm-kisan-scheme २०१९ मध्ये सुरू झालेल्या पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. यापर्यंत २१ हप्ते योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून, सुमारे ४.०९ लाख कोटी रुपये वितरित झाले आहेत. सध्या शेतकऱ्यांना २२ व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.
 
pm-kisan-scheme
 
या योजनेत अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ दिला जातो, तर जास्त उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत नाही. डिसेंबर २०२४ मध्ये संसद समितीने सूचना दिल्या होत्या की वार्षिक रक्कम ६,००० रुपयांऐवजी १२,००० रुपये करण्यात यावी, ज्यामुळे पुढील वर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात ही वाढ होऊ शकेल, अशी चर्चा रंगली होती. अंदाज आहे की २२ वा हप्ता फेब्रुवारी २०२६ मध्ये जमा होऊ शकतो. pm-kisan-scheme शेतकरी कल्याण मंत्रालयाचे राज्य मंत्री रामनाथ ठाकूर यांनी यावर स्पष्ट केले की सरकारकडे हप्त्याची रक्कम वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या नाही, त्यामुळे सध्याची ६,००० रुपयांची रक्कम कायम राहणार आहे.
तसेच, शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडीची अट नव्याने लागू करण्यात आली आहे. ज्या राज्यात ही प्रक्रिया सुरू आहे, तिथल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक आहे. pm-kisan-scheme सध्या १४ राज्यांमध्ये ही प्रक्रिया सुरू आहे. ज्याठिकाणी ही प्रक्रिया सुरू नाही, तिथल्या शेतकऱ्यांना सवलत दिली आहे. सध्या २१ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला असून, पुढील हप्ता जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. यासंबंधीची अद्ययावत माहिती पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल.