नागपूर,
Prahar Military School जिल्हा क्रीडा संघटना, नागपूर यांच्या वतीने मानकापूर स्टेडियम येथे क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रहार मिलिटरी स्कूल, रविनगरच्या १५ वर्षांखालील मुला-मुलींच्या हँडबॉल संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक पटकावला.
या यशाबद्दल क्रीडा शिक्षक ओमप्रकाश शाहू यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी घवघवीत कामगिरी केली. या उल्लेखनीय यशासाठी प्रहार मिलिटरी स्कूलच्या मुख्याध्यापिका वंदना कुळकर्णी यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. Prahar Military School यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारीवर्ग उपस्थित होता.
सौजन्य: देवराव प्रधान, संपर्क मित्र