कारंजा लाड,
accidental insurance benefit, अकोला— - वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नाबार्डच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा योजना प्रभावीपणे राबवत असून, या योजनेचा लाभ कारंजा तालुयातील एका खातेदाराच्या कुटुंबाला मिळाला आहे. कारंजा मार्केट यार्ड शाखेचे खातेदार छाया गजानन गावंडे यांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच कारंजा मार्केट यार्ड शाखेचे प्रभारी शाखाधिकारी आर. डब्ल्यू. सरक यांनी तात्काळ खातेदाराच्या नातेवाइकांशी संपर्क साधून संबंधित खातेदाराची प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत २ लाख रुपयांची अपघात विमा पॉलिसी अस्तित्वात असल्याची माहिती दिली.
वारसदारांकडून आवश्यक लेम फॉर्म भरून घेऊन सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली व हे प्रकरण मुख्य कार्यालयातील प्रफुल पाटील यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले. बँकेकडून सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत २ लाख रुपयांचा विमा दावा मंजूर करण्यात आला. मंजूर रकमेचा धनादेश अपघातातील मृत खातेदारांचे पुत्र कपिल गजानन गावंडे यांना बँकेचे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ संचालक एस. एस. कानकिरड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी तालुका प्रमुख बी. एम. राठोड, प्रभारी शाखाधिकारी आर. डब्ल्यू. सरक, ए. बी. पदमने, कारंजा मार्केट यार्ड शाखेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
कुटुंबातील कर्ता accidental insurance benefit, व्यक्ती गमावल्याने वारसदारांसमोर आर्थिक संकट उभे राहिले होते. मात्र बँकेमार्फत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ मिळाल्याने कुटुंबाला मोठा आधार मिळाल्याची भावना वारसदारांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी बँकेचे अध्यक्ष संतोष कोरपे, संचालक मंडळ तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य यांचे आभार मानले. दरम्यान, जास्तीत जास्त खातेदारांनी सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेकडून करण्यात आले आहे. या संवेदनशील व तत्पर कार्यवाहीबद्दल जिल्हाभरातून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कौतुक होत आहे.