मराठी अभिनेत्री पहिल्यांदाच करणार इमरानसोबत काम!

    दिनांक :19-Dec-2025
Total Views |
मुंबई,
Akshaya Naik ‘सुंदरा’ ही भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अक्षया नाईक लवकरच एका बड्या बॉलीवूड प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे. वर्ष संपताना तिने चाहत्यांसाठी ही खास बातमी सोशल मीडियावर दिली. काही दिवसांपूर्वीच तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले असून मराठी प्रेक्षकांसह हिंदी प्रेक्षकांचं लक्षही वेधून घेतलं आहे. आता लवकरच अक्षया आणखी एका महत्वाच्या बड्या प्रोजेक्टचा भाग होणार आहे, ज्याचे काही फोटो तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
 
 
Akshaya Naik
अक्षयाने नेटफ्लिक्सवर येणाऱ्या आगामी वेब सीरिज “तस्करी” मध्ये अनेक बड्या बॉलीवूड स्टार्ससोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. नुकताच याचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीस आला असून त्यात ती इमरान हाश्मीसोबत एका सीनमध्ये दिसत आहे. अक्षयाच्या पहिल्या वेब सीरिजमध्येच इमरान सारख्या प्रसिद्ध कलाकारांसोबत काम करणे ही तिच्यासाठी एक मोठी संधी आहे, असे समीक्षक आणि चाहत्यांचा असा अनुभव आहे.
 
 
“इमरान हाश्मी Akshaya Naik  सरांसारख्या बॉलीवूडमधल्या मोठया स्टारसोबत काम करताना ही भावना खूप खास होती. आमच्या दोघांचे फक्त 2-3 सीन होते, पण ते करताना थोडं दडपण आलं आणि तेवढंच छान देखील वाटलं. पहिली वेब सीरिज आणि सहकलाकार म्हणून इमरान सरांसोबत काम करायला मिळणं ही माझ्यासाठी सुवर्ण संधी आहे,” असे अक्षया नाईकने सांगितले.फॅशन असो वा अभिनय, अक्षया नेहमीच चर्चेत राहिली आहे. आगामी काळात ती नावीन्यपूर्ण प्रोजेक्ट्स आणि विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे जाणकारांकडून समजते. तिने नुकताच ओटीटीवर पदार्पण केले असून आता तिच्या चाहत्यांना ती बॉलीवूड चित्रपटात पाहण्यासाठी मोठी उत्सुकता आहे. “तस्करी” ही वेब सीरिजही नेटफ्लिक्सवर लवकरच प्रदर्शित होणार आहे.अक्षया नाईकची ही वाटचाल मराठी सिनेसृष्टीपासून बॉलीवूडच्या मोठ्या पडद्यापर्यंत आहे, आणि तिच्या चाहत्यांना तिच्या पुढील प्रोजेक्ट्ससाठी खूप उत्सुकता वाटते.