भाजप ओबीसी आघाडीची कार्यकारिणी जाहीर

    दिनांक :19-Dec-2025
Total Views |
नागपूर,
BJP भारतीय जनता पक्ष ओबीसी आघाडीच्या नागपूर येथील इतवारी मंडळाच्या अध्यक्षा कल्पना मानापुरे यांनी कार्यकारिणी जाहीर केली. अध्यक्ष दयाशंकर तिवारी, आमदार प्रवीण दटके, माजी आमदार विकास कुंभारे आणि गिरीश व्यास यांनी कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. कार्यकारिणीत महामंत्री पदी शेखर कडवे, दिगंत येरणे, मीना सहारे; संपर्क प्रमुख पदी कल्याणी कुबडे; सहसंपर्क प्रमुख पदी वंदना निमकर; मिडिया प्रमुख पदी प्रमोद बेले; कोषाध्यक्ष पदी शिला धुळे यांची नियुक्ती करण्यात आली. याशिवाय ६ उपाध्यक्ष आणि १२ मंत्रीही नियुक्त करण्यात आले आहेत.
 
 
BJP
 
कार्यक्रमाचे संचालन प्रिती गायधने यांनी केले, तर रूपाली नाकोड, लता दुरूगकर आणि सोनाली सहारे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. BJP कार्यक्रमाला भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकारिणीत सहभागी झालेले प्रमुख सदस्यांमध्ये श्याम चांदेकर, बंडुजी राऊत, राहुल खंगार, भुषण दडवे, तुषार लारोकर, दिगांबर बुरडे, हेमंत बरडे, संदीप टामने, श्रद्धा पाठक, कवीता इंगळे यांचा समावेश होता.
सौजन्य: कल्पना मानापुरे, संपर्क मित्र