सर्क्युलर रोडवर चौपाटी जवळ बाहेकर कॉम्प्लेस ड्रायफूड दूकानाला आग

    दिनांक :19-Dec-2025
Total Views |
बुलढाणा,
Buldhana, येथील लहाने लेआउट नजीकच्या चौपाटी जवळ असलेल्या बाहेकर यांच्या कॉम्प्लेस मध्ये थोड्या वेळापूर्वी आग लागली. भाजप नेते जगदेवराव बाहेकर यांच्या निवासस्थानाच्या खाली असलेल्या दुकानांमध्ये ही आग दि. १९ डिसेंबर रोजी दुपारी लागली होती. पर्वणी ड्राय फ्रुटमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली.
 

Buldhana, 
आग लागण्याचे लक्षात आले असता तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न करण्यात आले. परंतु आगीने जोर पकडला होता. नगर परिषदेचे अग्निशमन वाहन तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. कुठलीही जीवितहानी झाली नाही परंतु दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. अनिरुद्ध जाधव हे दुकानाचे मालक आहेत. रहदारीच्या भर चौकातील दुकानांमध्ये आग लागल्यामुळे शेकडो लोकांची गर्दी या परिसरामध्ये जमा झाली होती. सर्युलर रोड वर वाहतूक कोंडी झाली होती.