शेतात गांजा लागवड करणार्‍या एकास पकडले १२ लाख ५२ हजार १०० रूपयाचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांची कारवाई

    दिनांक :19-Dec-2025
Total Views |
बुलढाणा,
illegal cannabis cultivation,पो.स्टे. साखरखेर्डा हद्दीतील ग्राम मलकापूर पांग्रा शिवारात सुधाकर गायकवाड यांच्या शेतामध्ये अवैधरित्या गांजाची लागवड व संगोपन करुन, चोरटी विक्री करण्याच्या उद्ददेशाने गांजा ताब्यामध्ये बाळगून आहे. अशा माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पो.स्टे. साखरखेर्डा हद्दीत सुधाकर गायकवाड यांचे ग्राम रा. मलकापूर पांग्रा शिवारातील शेतामध्ये पंचासमक्ष धाड टाकली असता शेतातील कपाशी-तुरीच्या उभ्या पिकामध्ये गांजाच्या झाडांची लागवड, संगोपण व साठवणूक केली असल्याचे दिसून आले. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे संकल्पनेतून जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी मिशन परिवर्तन राबविण्यात येत आहे
 

illegal cannabis cultivation, 
आरोपी सुधाकर संपतराव गायकवाड वय ६५ वर्षे रा. मलकापूर पांग्रा, ता. सिंदखेड राजा जि. बुलढाणा यांचे ताब्यातून ओलसर गांजाची झाडे ७६ किलो ०६ ग्रॅम किं. ११ लाख ४० हजार ९०० रुपये, गांजाची सुकलेली झाडे किं. १ लाख ११ हजार २०० रूपये असा एकूण १२ लाख ५२ हजार १०० रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुध्द पो.स्टे. साखरखेर्डा येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
ही कार्यवाही जिपो अधिक्षक निलेश तांबे यांचे आदेशान्वये तर श्रेणिक लोढा अपर पोलीस अधीक्षक खामगांव, अमोल गायकवाड-अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. सुनिल अंबुलकर यांचे नेतृत्वात सपोनि. यशोदा कणसे, पोहेकॉ. दिगंबर कपाटे, गजानन दराडे, मपोहेकॉ. वनिता शिंगणे, पोना. विजय वारुळे, पोकॉ. दिपक वायाळ, मंगेश सनगाळे, मनोज खरडे, चापोहेकॉ. समाधान टेकाळे स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांचे पथकाने केली.