सुसज्ज, प्रसन्न कार्यालयातून हसरे चेहरे जातील

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आ. बकाने यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण

    दिनांक :19-Dec-2025
Total Views |
देवळी,
Rajesh Bakane, आपल्याकडे समस्या घेऊन येणार्‍यांची संख्या अधिक असते. देवळी मतदार संघाला जनसंपर्क कार्यालयात सहज उपलब्ध होणारा आमदार २५ वर्षांनंतर मिळाला. आ. बकाने यांचे कार्यालय सुसज्ज आहे. येथे प्रसन्नता जाणवते. येथे येणारा प्रत्येक व्यती आनंदी चेहर्‍यानेच गेला पाहिजे आणि जात असेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यत केला.
 

Devli, Rajesh Bakane, 
आ. राजेश बकाने यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, आ. राजेश बकाने, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय गाते, माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, आदींची उपस्थिती होती.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण जनसंपर्क कार्यालयाची पाहणी केली. कार्यालयातील प्रत्येक कक्ष, नागरिकांसाठी उभारलेली सुविधा, कामकाजाची मांडणी याकडे त्यांनी बारकाईने लक्ष दिले.
तसेच जनसंपर्क कार्यालयातील कर्मचारी, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी साधला तसेच काही मोलाच्या सूचना दिल्या. आ. बकाने यांनी देवळी पुलगाव मतदार संघातील नागरिकांच्या अपेक्षाही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कानावर टाकल्या. यावेळी राहुल चोपडा, प्रशांत इंगोले, जयश्री मोकदम, स्वप्निल खडसे, राजू किटकुले, गौरव गावंडे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते