तभा वृत्तसेवा
ढाणकी,
dhanki-shankarpatt : येथील श्री दत्त देवस्थान टेंभेश्वर नगरच्या वतीने आयोजित भव्य बैलगाडी शर्यतीत (शंकरपट) शिरपूरच्या ‘जॉबर’ आणि ‘लाडक्या’ या बैलजोडीने आपल्या चित्तथरारक वेगाने मैदान मारले. या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत अवघ्या 6.40 सेकंदात अंतर पार करून या जोडीने ‘अ’ गटात प्रथम क्रमांक पटकावला. शिरपूर येथील बैलजोडीमालक योगेश बाबूसिंग जाधव यांच्या मालकीच्या ‘जॉबर व लाडक्या’ या जोडीने या स्पर्धेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
छत्रपती संभाजीनगर येथील मारेकरी चित्रा पोले यांनी ही बैलजोडी पळवली. त्यांच्या अचूक नियोजनामुळे या जोडीने विक्रमी वेळेची नोंद करत 31 हजार 111 रुपयांचे रोख पारितोषिक आणि मानचिन्ह पटकावले. ‘ब’ गटात चैतन्या मनोज तोकलवाड यांनी प्रथम क्रमांक मिळवत 12 हजार 111 रुपयांचे बक्षीस जिंकले. स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी किशोर ठाकूर, कृष्णा महाराज, रमन रावते, अतुल येरावार, सुभाष कुचेरिया, पुरुषोत्तम चिन्नावार, दत्तदिगंबर वानखेडे, बाळासाहेब शहापुरे, स्वप्निल चिकाटे, प्रफुल कोठारी, रामराव गायकवाड, उत्तम रावते, निसार पठाण, उमेश योगेवार, प्रवीण धोपटे, हन्नान ठेकेदार व नागेश रातोळे यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.
शर्यतीदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलिस कर्मचारी मोहन चाटे, रवी गीते, जाधव व इतर पोलिस कर्मचाèयांनी कर्तव्य बजावले.
या शंकरपटाच्या नियोजनासाठी पप्पू येरावार, अनिल तोडकर, शिवाजी सुरोशे, सिद्धार्थ गायकवाड, राहुल सोनटक्के, शुभम गायकवाड व त्यांच्या सर्व सहकाèयांनी सहकार्य केले. हा थरार पाहण्यासाठी परिसरातील हजारो बैलगाडी शौकिनांनी मोठी गर्दी केली होती.