नवी दिल्ली,
Dhoni's final plan for IPL 2026 एम एस धोनीचा आयपीएलमधील रिटायरमेंट प्लॅन ठरला असून, चेन्नई सुपरकिंग्सने त्यासाठी 32.50 कोटी रुपये खर्च केले आहेत. 44 वर्षांच्या धोनीसाठी आयपीएल 2026 हा अंतिम सीजन असण्याची शक्यता आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली CSKने पाच वेळा विजेतेपद मिळवले असून संघाच्या रणनीतीत त्याच्या निवृत्तीनंतरची तयारी सुरु आहे. सीएसके धोनीच्या जागी येणाऱ्या तीन विकेटकिपर फलंदाजांना संघात सामील करून संघाचे भविष्य सुरक्षित केले आहे. संजू सॅमसनला ट्रेडद्वारे संघात आणले तर कार्तिक शर्मा आणि उर्विल पटेल यांना ऑक्शनमधून खरेदी करण्यात आले. या तीन खेळाडूंवर सीएसकेने जवळपास 32.50 कोटी रुपये खर्च केले आहेत.

आयपीएल 2026 साठी CSKने ऑक्शनमध्ये 9 महत्वाचे खेळाडू विकत घेतले आहेत, ज्यात कार्तिक शर्मा, प्रशांत वीर, राहुल चाहर, मॅट हेन्री, अकील होसेन, मॅथ्यू शॉर्ट, झॅक फॉल्केस, सरफराज खान आणि अमन खान यांचा समावेश आहे. चेन्नई सुपरकिंग्स हा संघ आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असून 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 मध्ये विजेतेपद पटकावले आहे. संघाने सात वेळा उपविजेतेपदही मिळवले आहे. मागील काही हंगामांत संघाची कामगिरी चढ-उताराची राहिली आहे, तरी धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने कायम दमदार कामगिरी केली आहे.
सध्या सीएसकेच्या संघात एम एस धोनी, रुतुराज गायकवाड़, संजू सॅमसन, आयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, उर्विल पटेल, नूर अहमद, नाथन एलिस, श्रेयस गोपाल, खलील अहमद, रामकृष्ण घोष, मुकेश चौधरी, जेमी ओवरटन, गुरजापनीत सिंह, अंशुल कंबोज आणि इतर खेळाडू आहेत. या संघ रचनेत धोनीच्या अंतिम सीजनासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे.