वॉशिंग्टन,
epstein-files अमेरिकेतील हाऊस ओव्हरसाईट कमिटीतील डेमोक्रॅट सदस्यांनी गुरुवारी काही धक्कादायक छायाचित्रे आणि कागदपत्रे सार्वजनिक केली असून, त्यामुळे जेफ्री एपस्टीन प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या छायाचित्रांमध्ये मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्यासह अनेक नामवंत व्यक्ती काही महिलांसोबत दिसत आहेत. मात्र समितीने स्पष्ट केले आहे की या फोटोंमध्ये दिसणाऱ्या सर्वच व्यक्ती एपस्टीनच्या लैंगिक शोषण प्रकरणात सहभागी होत्या, असा निष्कर्ष काढता येणार नाही.
या छायाचित्रांपैकी काही फोटो विशेषतः धक्कादायक ठरले आहेत. एका फोटोमध्ये एका महिलेच्या पायावर प्रसिद्ध लेखक व्लादिमीर नाबोकोव्ह यांच्या वादग्रस्त कादंबरी ‘लोलिता’मधील ओळी लिहिलेल्या दिसतात. तर इतर काही फोटोंमध्ये मुलींच्या मानेवर, पाठीवर आणि पायांवर याच कादंबरीतील वाक्ये लिहिलेली आढळतात. “She was Lo, plain Lo, in the morning…”, “She was Lola in slacks”, “She was Dolly at school” अशा ओळी शरीरावर लिहिल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. एका फोटोमध्ये ‘लोलिता’ ही कादंबरी थेट बेडवर ठेवलेलीही दिसते. समितीच्या सदस्यांच्या मते, या ओळी केवळ साहित्यिक संदर्भ नसून त्या ‘कोड वर्ड’ स्वरूपात वापरल्या जात होत्या. या मजकुराच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीला काही संकेत दिले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. epstein-files या संपूर्ण प्रकरणामुळे एपस्टीनच्या नेटवर्कमधील पद्धतशीर आणि नियोजित स्वरूपातील गैरप्रकारांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
याशिवाय, समितीच्या हाती लागलेल्या काही संदेशांमध्ये अल्पवयीन किंवा तरुण मुलींच्या ‘रेट’बाबत चर्चा झाल्याचेही समोर आले आहे. एका संवादात, सध्या कोणाला पाठवता येणार नसल्याचा उल्लेख आहे, तर दुसऱ्या संदेशात एका ओळखीतील १८ वर्षांच्या मुलीबाबत माहिती देण्यात आली असून ती १,००० डॉलर्सची मागणी करत असल्याचे नमूद आहे. या संदेशांमध्ये संबंधित मुलीचे नाव, वय, उंची, वजन, शरीराचे माप तसेच येण्याजाण्याची वेळही तपशीलवार दिलेली आहे. या संवादांमधून अनेक मुली रशियातून आणल्या जात असल्याचे संकेतही मिळतात. जेफ्री एपस्टीन फाईल्समधून समोर आलेल्या माहितीनुसार, त्याने आपल्या प्रभाव आणि ओळखींचा वापर करून अनेक कोवळ्या वयातील मुलींचे लैंगिक शोषण केले. त्याच्या या रॅकेटमध्ये इतर काही सहकारीही सहभागी असल्याचा आरोप आहे. epstein-files अनेक पीडितांचे आयुष्य या प्रकरणामुळे उद्ध्वस्त झाले. एपस्टीनवर बड्या राजकीय नेत्यांना, उद्योगपतींना आणि अतिशय श्रीमंत व्यक्तींना मुली पुरवल्याचे गंभीर आरोप होते.
एपस्टीनला यापूर्वी १३ महिन्यांची शिक्षा झाली होती. मात्र २०१५ नंतर पुन्हा गंभीर आरोप झाल्यानंतर २०१९ मध्ये त्याला अटक करून तुरुंगात ठेवण्यात आले. त्याच काळात तुरुंगात त्याचा मृत्यू झाला असून, अधिकृतपणे त्याने आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र आजही या मृत्यूभोवती संशयाचे सावट कायम आहे. हाऊस ओव्हरसाईट कमिटीने जाहीर केलेल्या नव्या पुराव्यांमुळे हे प्रकरण पुन्हा एकदा जागतिक पातळीवर चर्चेचा विषय बनले आहे.