बहरीन,
Indian jersey Pakistani Kabaddi player बहरीनमध्ये झालेल्या एका खाजगी कबड्डी स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडू उबैदुल्लाह राजपूतने भारतीय जर्सी घालून सामना खेळल्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरु झाली आहे. सामना जिंकल्यानंतर त्याने भारतीय ध्वज फडकवला, ज्यामुळे अनेकांनी त्याला 'धुरंधर' म्हटले. या घटनेमुळे सोशल मीडिया राडा झाला असून लोकांनी त्याचे कौतुक केले आहे. उबैदुल्लाह राजपूत १६ डिसेंबर रोजी बहरीनमध्ये खेळत होता. मात्र, तो आपल्या देशासाठी नव्हे, तर भारतासाठी खेळला. विजयानंतर त्याचा भारतीय ध्वज उंचावलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि यामुळे अनेकांनी त्याला धुरंधर चित्रपटातील रणवीर सिंगसारखा दुसरा 'धुरंधर' म्हटले.
पाकिस्तानमध्ये या घटनेवर कारवाईची मागणी होत असून, लवकरच यावर बैठक होणार आहे. उबैदुल्लाह यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांचा दावा आहे की ही चूक अनवधानाने झाली आणि त्यांना आधीच माहिती नव्हती की संघाचे नाव भारत असेल. त्यांनी म्हटले की कोणत्याही भावनांना दुखावण्याचा त्यांचा हेतू नव्हता आणि जर कोणालाही वाईट वाटले असेल तर त्यांनी मनापासून माफी मागितली आहे. त्यांनी हेही स्पष्ट केले की हा सामना आंतरराष्ट्रीय किंवा विश्वचषक पातळीवरील नव्हता, तर एक खाजगी स्पर्धा होती. त्यामुळे या घटनेला अधिक महत्त्व देण्याची गरज नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावर उबैदुल्लाह राजपूतला मोठे कौतुक मिळाले असून, भारतासाठी खेळणाऱ्या धुरंधर खेळाडू म्हणून त्याला अनेकांनी गौरवले आहे.