बुटीबोरी एमआयडीसीत टँक टॉवर कोसळला; सहा कामगारांचा मृत्यू

    दिनांक :19-Dec-2025
Total Views |
नागपूर,
Avada Company accident tank tower collapse  बुटीबोरी एमआयडीसी शहरातील बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात शुक्रवारी दुपारी मोठा अपघात घडला. अवाडा कंपनीच्या परिसरात असलेल्या टँक टॉवर कोसळल्याने आठ कामगार दाबले गेले. जोरदार स्फोटासारखा आवाज ऐकून परिसरात अचानक खळबळ उडाली.
 

Nagpur, Butibori MIDC, Avada Company accident, tank tower collapse 
अपघाताच्या ताबडतोब नागरिकांनी स्थानिक पोलिस, अग्निशमन दल आणि बचाव यंत्रणांना घटना कळवली. कंपनीनेही शासकीय यंत्रणा आणि स्थानिक तज्ज्ञांच्या मदतीने कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले. दाबलेल्या कामगारांना ताबडतोब बाहेर काढून बुटीबोरी परिसरातील माया रुग्णालयात दाखल केले गेले, तर काही गंभीर जखमींना नागपुर एम्स रुग्णालयात हलवण्यात आले. जखमी कामगारांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतल्यामुळे परिसरात मोठी गर्दी झाली. पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त वाढवला असून सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे.
 
 
 
सध्या कंपनी आणि Avada Company accident tank tower collapse  स्थानिक प्रशासन एकत्रितपणे बचावकार्य करत असून मृत्यू किंवा गंभीर दुखापतींची अंतिम संख्या समजून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या अपघातात सौर पॅनेल उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या टँक टॉवरचा मोठ्या प्रमाणावर कोसळलेला भाग दिसून आला.अद्ययावत माहितीप्रमाणे, अपघातातील मृत्यू संख्या तीन वर पोहचली आहे. मृतदेह नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आले आहेत. तसेच, आणखी दोन गंभीर जखमी कामगारांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मेडिकलमध्ये रुग्ण दाखल झाले असून त्यापैकी  सहा कामगारांचा मृत्यू झाला 
 
 
बुटीबोरी एमआयडीसीतील ही घटना परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि चिंता निर्माण करत आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. औद्योगिक सुरक्षा नियमांचे पालन आणि तत्काळ बचावकार्य यावर विशेष लक्ष देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.