नागपूर,
nagpur-weather : उत्तर भारतातील दाट धुक्याचा फटका विमान व रेल्वे वाहतुकीला बसला असताना नागपूरचा आता पुन्हा घसरला आहे. संपूर्ण विदर्भात सर्वात थंड शहर म्हणून गोंदियाची नोंद झाली आहे. शुक्रवारी नागपूरचा पारा ८.५ तर गोंदिया ८.० अंशांवर आले आहे. पुढील १५ दिवसपर्यंत कडक्याच्या थंडीचा अनुभव मिळणार आहे. गोंदियात सातत्याने नीचांकी तापमानाची नोंद होत आहे. संपूर्ण विदर्भात शीतलहर असल्याने साठ नागपूरचा पारा चोवीस अर्ध्या अंशाने १० अंशांवर आला. तर सध्या थंडीचे केंद्रस्थान असलेल्या गोंदिया येथे नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली. शीतलहरसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्यामुळे आठवड्यात गारठा वाढण्याची शक्यता आहे.
उत्तर भारतात हिमवृष्टीचा जोर
कडाक्याची थंडी आणि दाट धुक्याचा मोठा फटका विमान व रेल्वे वाहतुकीला बसला आहे. शुक्रवारी सुध्दा नागपूर विमानतळावर विमानांच्या विस्कळीत वेळापत्रकामुळे मनस्ताप सहन करावा लागला. जम्मू-काश्मीर आणि उत्तर भारतात हिमवृष्टीचा जोर वाढल्याने विदर्भ, मध्यप्रदेश, छत्तीसगडसह मध्यभारतातील अन्य मैदानी भागात थंडी वाढली आहे. यंदाच्या मौसमात गोंदिया आणि नागपूर या दोन्ही शहराला शीतलहरीचा विळखा असला आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमधील तापमान १० अंशांच्या जवळपास आहे. थंडीमुळे अनेक भागात शेकोटया पेटलेल्या दिसून येत आहे.