प्रशांत लांडकर यांची सैन्य दलात निवड

    दिनांक :19-Dec-2025
Total Views |
वाशीम,
prashant landkar मालेगाव तालुक्यातील बोरगाव येथील प्रशांत रामदास लांडकर यांची भारतीय सैन्य दलात तांत्रिक (टेनिकल) पदावर नियुक्ती झाली आहे. या पदावर पोहोचण्यासाठी त्यांनी घेतलेल्या परिश्रमाला फळ आले आहे.
 
 
पप्रशांत लाडकर
 
बोरगाव येथील अल्पभूधारक शेतकरी रामदास लांडकर हे अतिशय कष्टाळू म्हणून ओळखले जातात. त्यांचा मुलगा प्रशांत हा त्यांना शेती कामात मदत करतो. शेतातील कामासोबत शेतकरी रामदास लांडकर यांनी प्रवासी ऑटो चालवला. त्यांचा मुलगा प्रशांत यांनी गावात पाव विकले. शेतातील सर्व कामे करून, अभ्यास करून मेहनतीने, शिस्तीने आणि जिद्दीने आज हे यश मिळवले आहे.
प्रशांतला त्याचे काका बाबाराव लांडकर यांचे मार्गदर्शन मिळाले.prashant landkar बोरगाव परिसरातील आणि वाशीम जिल्ह्यातील युवकांकरिता त्याची ही कामगिरी प्रेरणादायी ठरली आहे. देश सेवेच्या मार्गावर पाऊल टाकल्याबद्दल प्रशांत रामदास लांडकर यांचे परिसरात कौतुक होत आहे.