नागपूर,
Saraswati Vidyalaya Shankarnagar शंकर नगर येथील सरस्वती विद्यालय उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय येथे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात प्रतीकात्मक दीपप्रज्वलन, प्रार्थना व स्वागत नृत्याने करण्यात आली, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भूवैज्ञानिक सर्वेक्षणचे उपमहासंचालक श्री. टी. वैदीस्वरन होते. त्यांचा सत्कार दक्षिण भारतीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. टी. के. व्यंकटेश यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला दक्षिण भारतीय शिक्षण संस्थेच्या पालक मंडळाचे सदस्य मानद सचिव व्ही. मीनाक्षी ,व्ही. संपत, एस. कृष्णकुमार, आर. कुमार, जे. राधाकृष्णन, एडीसी समितीचे सह-अध्यक्ष डॉ. सुरेश चारी, समन्वयक एस. प्रभूरामन यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात वार्षिक अहवाल सादरीकरणाने झाली. या अहवालात पूर्व-प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन विभागांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीवर प्रकाश टाकण्यात आला.समारंभाचे मुख्य आकर्षण ठरलेले बक्षीस वितरण पार पडले.Saraswati Vidyalaya Shankarnagar विविध विभागांतील गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ज्ञान, कौशल्ये आणि मूल्ये हे यशाचे तीन महत्त्वाचे आधार असल्याचे सांगितले. शिक्षक हे राष्ट्राचे शिल्पकार असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली गुजर व रोहिणी महल्ले यांनी केले. कार्यक्रमाची सांगता अस्मित पिंपळकर यांच्या आभार प्रदर्शनाने व देशभक्तीची भावना जागवणाऱ्या ‘वंदे मातरम्’ या गीताने झाली.
सौजन्य :अनघा पेंडके,संपर्क मित्र