ट्रम्प यांनी भारताचे मॉडेल अमेरिकेत राबवले; व्हाईट हाऊसमधून केली मोठी घोषणा

    दिनांक :19-Dec-2025
Total Views |
वॉशिंग्टन,  
trump-implemented-indias-model-in-us गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारने सामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या आहेत. मोफत धान्य वितरण, गरीब कुटुंबांसाठी मोफत आरोग्यसेवा, शेतकऱ्यांना आर्थिक मदत, जनधन योजना, मातृत्व वंदना योजना तसेच बेरोजगारांसाठी विविध उपक्रम यामुळे सरकारच्या धोरणांची देशभरात मोठी चर्चा झाली आहे.
 
 
trump-implemented-indias-model-in-us
 
याशिवाय राज्य सरकारांनीही आपापल्या पातळीवर स्वतंत्र योजना राबवल्या असून महाराष्ट्रातील कन्या योजना, महिलांसाठी एसटी प्रवास सवलत यांसारख्या योजनांना मोठा प्रतिसाद मिळाला आहे. trump-implemented-indias-model-in-us अशा योजनांचा थेट फायदा सत्ताधारी पक्षांना निवडणुकांमध्ये झाल्याचेही दिसून आले आहे. बिहारमध्ये निवडणुकांपूर्वी महिलांच्या खात्यात थेट दहा हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर एनडीएला राजकीय फायदा झाल्याची चर्चा झाली होती. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर अमेरिकेतही अशाच प्रकारच्या थेट आर्थिक मदतीच्या मॉडेलची चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेचे  राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ख्रिसमसपूर्वी एक मोठी घोषणा केली असून, देशातील सुमारे १४.५ लाख सैनिकांच्या बँक खात्यात प्रत्येकी १,७७६ डॉलर्स, म्हणजेच सुमारे दीड लाख रुपयांची रक्कम जमा केली जाणार आहे. या योजनेला त्यांनी ‘वॉरियर डिव्हिडंड’ असे नाव दिले आहे.
व्हाईट हाऊसमधून जाहीर करण्यात आलेल्या या योजनेनुसार, ख्रिसमस सुट्ट्या सुरू होण्यापूर्वी ही रक्कम थेट सैनिकांच्या खात्यात जमा केली जाईल. विविध देशांवर शुल्क लावून अमेरिकेला मिळालेल्या आर्थिक फायद्यातून हा उपक्रम राबवला जात असल्याचे सांगितले जात आहे. trump-implemented-indias-model-in-us पुढील वर्षी होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही या निर्णयाकडे पाहिले जात आहे. काही धोरणात्मक निर्णयांमुळे ट्रम्प यांची लोकप्रियता कमी झाल्याचे मानले जाते आणि ती पुन्हा मिळवण्यासाठी अशा प्रकारच्या थेट आर्थिक मदतीच्या योजना सुरू केल्या जात असल्याची चर्चा अमेरिकेत रंगली आहे.